ना. अब्दुल सत्तारांचा अभिष्टचिंतन सोहळा जल्लोषात, दिव्यांग मात्र पाच टक्के निधीच्या प्रतीक्षेत…
नामदारांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात दिव्यांगांची दिशाभूल.

सोयगाव दि. ०६ (वृत्तसेवा) नगर पंचायत मार्फत दिव्यांगाना दिव्यांग पाच टक्के निधी वाटप चा कार्यक्रम नगर पंचायत कार्यालयात न घेता मुख्याधिकारी बबन तडवी यांनी राजकीय दबावाखाली शिंदे गटाचे आमदार तथा कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांच्या संपर्क कार्यालयात त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून दि. ०२ मंगळवार रोजी दिव्यांग बांधवांना पाच टक्के निधी वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सोयगाव शहरातील दिव्यांगाना सोयगाव नगर पंचायत चे मुख्याधिकारी तडवी यांनी यावेळी अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या कार्यालय येथे बोलावून प्रसिद्धी मिळवण्यासाठी दिव्यांगास धनादेश देत फोटो शेषन केले. मात्र नगरपंचायत कडून देण्यात आलेल्या धनादेशानुसार आज पर्यंत कोणताही निधी दिव्यांगांच्या खात्यावर जमा झाला नसल्याने दिव्यांगांनी नाराजी व्यक्त केली आहे. दिवसभर दिव्यांगाना अभीष्टचिंतनच्या कार्यक्रमात ताटकळत बसून ठेऊन दिव्यांगांच्या भावनांशी नगर पंचायत खेळ करीत असल्याचे दिसून आले. एक तर दिव्यांगाना देण्यात येणारा निधी हा जन सामान्य यांच्या पैशातून व नगर पंचायतच्या उत्पन्नातून देण्यात येतो. मंग त्यासाठी एखाद्या राजकीय व्यक्तीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कार्यक्रमात चेक देऊन दिव्यांग बांधवांच्या भावना दुखावल्या आहे. कार्यक्रमाला गर्दी जमावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन मुख्याधिकार्यांनी जाणीवपूर्वक दिव्यांगांची हेळसांड केली आहे. अभिष्टचिंतन सोहळा फटाक्यांची आतिषबाजी व लादूतुलेने झाला मात्र दिव्यांगांच्या खात्यात लाडू रुपी पैसे कधी पडणार हा प्रश्न निरुत्तरीत आहे.
“नगर पंचायत तर्फे दिव्यांगाना देण्यात येणारा निधी हा न. प. च्या उत्पनाच्या पाच टक्के इतका असतो, सोयगाव नगरपंचायत मध्ये ७३ दिव्यांगांची नोंद घेण्यात आल्या आहे. त्यांना ८०,००० (ऐंशी हजार) निधी उपलब्ध केल्याचे नगर पंचायत प्रशासाने सांगितले आहे. त्यात कोणत्याही राजकीय व्यक्तीचा काहीही विषय नसतो. तरी देखील नगर पंचायत चे मुख्याधिकारी बबन तडवी यांनी नियमांचे उल्लघन करीत दिव्यांगांच्या भावनाशी खेळ केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ प्रशासनाने तात्काळ कारवाई करण्यात करावी.”
संदीप इंगळे प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन तालुकाध्यक्ष.


