महाराष्ट्र

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या राज्यस्तरीय खुल्या अधिवेशनात सोयगाव चे संदीप इंगळे यांचा सत्कार.

सोयगाव दि. ०६ (वृत्तसेवा) अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ आयोजित ९ खुल्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे दि. ४ गुरुवार रोजी जळगाव जामोद जि. बुलढाणा येथे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमांची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात येऊन मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, आद्य पत्रकार बाळ शास्री जांबेकर, पहिल्या महिला पत्रकार तानुबाई बिर्जे यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी क‌ॅबिनेट मंत्री आ. डॉ. संजय कुटे, अ. भा. ग्रा. पत्रकार संघ संस्थापक अध्यक्ष मनोहराव सुने, प्रदेशाध्यक्ष कैलास (बापु) देशमुख, राज्य पत्रकार अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य तथा सहयोगी संपादक दै. लोकमत मुंबई चे श्री. यदु जोशी, आय.एन.एस. समिती कार्यकारी सदस्य तथा दै. हिंदुस्थान चे प्रबंध संपादक विलासराव मराठे, दै. वृत्त केसरी संपादक तथा अमरावती विभागीय अधिस्विकृती समिती सदस्य जयरामजी आहुजा यांच्या सह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी दिव्यांग असुन देखील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मा. राज्यमंत्री तथा आ. डॉ. संजय कुटे यांच्या सह मान्यवरांच्या हस्ते सोयगाव येथील दै. देवगिरी वृत्त चे तालुका प्रतिनिधी तथा महाराष्ट्र लाईव्ह न्युज प्रोटलचे संपादक संदीप इंगळे यांना सन्मानचिन्ह, शाल, ग्रामगिता, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. राज्यभरातील पत्रकारांनी यावेळी उपस्थिती लावली होती. यावेळी अ. भा. ग्रा. पत्रकार संघाचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संदीप शिंदे, संपर्क प्रमुख जगदीश बुलबुले, सोयगाव तालुकाध्यक्ष दिलीप शिंदे, यादवकुमार (बाळु) शिंदे, अनिल लोखंडे, राहुल अजमेरे, अशोक ढगे आदींनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

“अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ राज्यव्यापी पत्रकार अधिवेशन दरम्यान मला मिळालेला हा सन्मान माझ्या साठी खुपच प्रेरणादायी आहे. मला मिळालेला हा सन्मान फक्त माझाच नाही तर माझा परीवार, सर्वच क्षेत्रातील माझे गुरु, तसेच माझ्या सोबत नेहमीच मला साथ देणारे सहकारी यांचा आहे. हा क्षण माझ्या साठी अविस्मरणीय आहे. त्यामुळे सर्व आयोजकांचा आभारी आहे.”
                               संदीप इंगळे सोयगाव जि. छत्रपती संभाजीनगर.

Related Articles

Back to top button