आपला जिल्हामहाराष्ट्र

सपोनि देविदास वाघमोडे यांना सामाजिक क्षेत्रातील “सेवा गौरव पुरस्कार” जाहीर.

सोयगाव दि. १२ (वृत्तसेवा) सु-लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था छत्रपती संभाजीनगर व माणुसकी रुग्णसेवा समूह शासकीय रुग्णालय घाटी छत्रपती संभाजीनगर यांच्या तर्फे देण्यात येणारा “सेवा गौरव पुरस्कार” सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेले सपोनि देविदास वाघमोडे यांना संस्थेचे संस्थापक व समाजसेवक सुमित पंडित यांनी निवडपत्र देऊन जाहीर केला आहे.

सपोनि देविदास बाळासाहेब वाघमोडे हे मुळचे डिग्रस ता. राहुरी जिल्हा अहमदनगर येथील रहिवाशी असून शेतमजूरी करणाऱ्या कुटुंबात यांचा जन्म झाला त्यांनी अतिशय मेहनतीने बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण केले त्यांनतर सन २००५ मध्ये वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षीच पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल या पदावर भरती झाले. त्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथून बी.ए. विषयात पदवी संपादन करून सन २०११ मध्ये एम.पी.एस.सी. खात्यांअंतर्गत सरळ सेवा परीक्षेमध्ये यश मिळवून फोजदार या पदावर निवड झाली त्यांनतर ठाणे शहर, बुलढाणा, वाशिम, आणि छत्रपती संभाजीनगर अशा जिल्ह्यामध्ये कोतवाली अहमदनगर, लोणार, शेगांव शहर, सोनाळा, बुलडाणा शहर, कारंजा ग्रामीण, वाशिम, कन्नड शहर, फर्दापूर, पिशोर एकूण १० पोलीस ठाणे आणि दोन महत्त्वाच्या शाखांमध्ये कामकाज केले आहे. आजपर्यंत तपास केलेल्या सत्र न्यायालय कमिट खटल्यांमध्ये न्यायालयाने चार केस मध्ये जन्मठेप व दोन केस मध्ये वीस वर्ष शिक्षा सुनावलेल्या आहेत. पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी म्हणून फर्दापूर येथे काम केले असून सध्या प्रभारी अधिकारी पिशोर पोलीस ठाणे येथे कामकाज सुरू आहे. आजपावेतो पोलीस दलामध्ये १८ वर्षे सेवा झालेली आहे.

यापूर्वी प्राप्त पुरस्कार – राज्यस्तरीय ज्ञानपंख गौरव पुरस्कार २०२२ समता ग्रामीण विकास प्रतिष्ठान व आपले ज्ञानपंख वृत्तपत्र सिल्लोड.महाराष्ट्र पोलीस भूषण पुरस्कार यापूर्वी मिळालेला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन.सेवा गौरव पुरस्कार सोहळा सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्णसेवा समूह घाटि छ.संभाजीनगर मार्फत दिला जाणार आहे.छ.संभाजीनगर येथे मोठ्या थाटात सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा व कु.लक्ष्मी सुमित पंडित हिच्या नवव्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक २९/१२/२०२३ रोजी शुक्रवारी दुपारी १२:१०.वा. ते ०५.१०.मी. पर्यत मौलाना आझाद रिसर्च सेंटर टिव्हि सेटर रोड छ.संभाजीनगर येथे कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. असे नीवड समिती तर्फे पत्राद्वारे समाजसेवक सुमित पंडित यांनी कळविले आहे. ह्या पुरस्काराने सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास बाळासाहेब वाघमोडे पिशोर पोलीस ठाणे यांचे सर्वस स्तरातुन कौतुक होत आहे.

Related Articles

Back to top button