आपला जिल्हामहाराष्ट्र
संविधान गौरव मिरवणूक व आदिवासी हक्क परिषदेत सोयगाव येथे संपन्न.

सोयगाव दि. २६ (वृत्तसेवा) बहुजन समाजने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहूजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा, एकलव्य आदी महापुरुषांच्या विचारणे एकत्र येऊन समता स्वतंत्र बंधुत्व निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अध्यक्षीय समारोपात बनेखा पठाण यांनी सोयगाव येथे दि. २६ रविवार रोजी सोयगाव येथे आयोजित संविधान रॅली नंतर आदिवासी हक्क परिषदेत केले.
महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषद व महात्मा फुले – छत्रपती शाहू महाराज – डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृती समितीच्या संयुक्त विद्यमाने दि. २६ रविवार रोजी सोयगाव येथे संविधान गौरव मिरवणूक व आदिवासी हक्क परिषद घेण्यात आली.
सर्वप्रथन सोयगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून प्रमुख आकर्षण असलेल्या भव्य प्रतिकात्मक संविधानाची रथावरून ढोल ताश्यांच्या गजरात महापुरुषांच्या घोषणांच्या निनानंदात संविधान मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत अबाल वृद्ध, तरुणांसह महिलांचा मोठा सहभाग होता. संगीताच्या तालावर महिला व युवक उत्साहाने थिरकत होते. ही मिरवणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – वाल्मिकीपुरा – नारळीबाग – छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे एस. टी. बसस्थानकामागे पंचायत समिती मैदानावर पोहचली.
यावेळी सिल्लोड – सोयगाव फुले शाहू आंबेडकर कृती समितीचे अध्यक्ष तसेच सिल्लोडचे माजी नगराध्यक्ष बनेखा पठाण यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी हक्क परिषद घेण्यात आली. यावेळी मंचावर महाराष्ट्र एकलव्य संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अफसर तडवी, बंजारा समाजाचे नेते चुणीलाली जाधव, बहुजन नेते विचारवंत पंडित बोर्डे, मुकुंद सोनवणे, कोळी समाज नेते प्रा. लक्ष्मण दांडगे, सोयगाव न.प. नगराध्यक्षा आशाबी तडवी, जब्बार तडवी, समीर पठाण, हुसेन तडवी, संघपाल सोनवणे व राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित गायक बिलाल तडवी, यांच्यासह संघटच्या महिला पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार डॉ. समीर तडवी यांनी केले. कार्यक्रमात सोयगाव तालुक्यासह भडगाव, पाचोरा, जामनेर, जळगाव, बुलढाणा, जालना, भोकरदन, जाफराबाद आदी ठिकाणाहून हजारो आदिवासी महिला व पुरुषांनी सहभाग घेतला होता.

यावेळी मुंबई येथील २६/११ च्या भ्याड हल्ल्यातील शाहिद पोलीस अधिकारी व जवानांच्या प्रतिमेस सोयगावच्या नगराध्यक्षा आशाबी तडवी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पन करण्यात आला.