महाराष्ट्र

सोयगाव तालुक्यात केंद्रीय पथकाची दुष्काळा ची पाहणी.

सोयगाव दि. १३ (वृत्तसेवा) सोयगाव सह अती गंभीर दुष्काळा ची बुधवरी केंद्रीय पथकांनी पाहणी केली यामध्ये सहा शेतकऱ्यांच्या शेतात पाहणी केली यावेळी फर्दापूर शिवारात सहा शेतकऱ्यांसोबत पथकाने संवाद साधला व नुकसानीची माहिती घेतली.
जंगला तांडा शिवारातील जुगराज राठोड गट क्र. १२१ लालचंद चव्हाण, वासुदेव चव्हाण, सुमित्राबाई चव्हाण, विजय सोनवणे, सलीम खान यांच्या शेतात केंद्रीय पथक प्रमुख अरविंद वाघमारे यांनी शेतातील पिकांच्या नुकसानची पाहणी केली पथकाच्या अरविंद वाघमारे, हरीश उंबरजे यांच्यासह पथकांनी पाहणी दरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधताना चारा टंचाई, पाणी टंचाई व टँकर सुरू आहेत की नाही याबाबत चर्चा केली धनवट शिवारात गट क्र. – ३३ मध्ये विजय सोनवणे, मुरलीधर सोनवणे यांचा शेतात पाहणी केली.
दुष्काळा च्या केंद्रीय पाहणी पथकात अरविंद वाघमारे, हरीश उंबरजे यांच्या सोबत कृषी अधिक्षक, कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव, पथक समन्वयक श्वेता कुर्हाडे, तालुका कृषी अधिकारी मदन सिसोदिया, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार मोहनलाल हारणे, नायब तहसीलदार गोरखनाथ सुरे, गटविकास अधिकारी दादाराव अहिरे, ग्रामविकास अधिकारी सुनिल मंगरुळे, गणेश गवळी, रमेश गुंडीले यांच्यासह शिवसेना तालुका प्रमुख प्रभाकर (आबा) काळे, ईश्वर क्षीरसागर, युवराज वामने, वसंत राठोड, बाबू चव्हाण, ताराचंद राठोड, यावेळी कृषी विभागाच्या संपत वाघ समाधान चौधरी, अतुल पाटील, प्रदिप पाटील, के. पी. महाजन, बेबीचंद चौरे, सरला चव्हाण, आरती बाविस्कर, विश्वजित तायडे मानसिंग भोळे, अर्जुन सुरडकर आदींनी पाहणीसाठी पूर्वतयारी केली होती.

Related Articles

Back to top button