सोयगावात सत्तारांच्या कार्यकर्त्याच्या व्हायरल पोस्ट मुळे मतदारांमध्ये संतापाची लाट, कार्यकर्तेच सत्तारांची वाट बिकट करीत असल्याची चर्चा….

सोयगाव दि. १३ (वृत्तसेवा) सत्तारांनी केलेल्या बेताल वक्तव्यांमुळे सिल्लोड – सोयगाव मतदारसंघात मतदारांकडून तीव्र निषेध केला जात असताना सत्तारांचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा नगरपंचायत गटनेता अक्षय काळे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने शहरात खळबळ उडाली आहे. या पोस्टमुळे मतदारांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, सत्तारांकडून सिल्लोड – सोयगाव मतदारसंघात महिलांना साड्यांचे वाटप केले जात आहे. सिल्लोड तालुक्यातील वांगी बु. येथे मुस्लिम महिलांनी धुडकूस घातल्याचे लोन सिल्लोड – सोयगाव मतदारसंघात पसरल्याने सत्तारांच्या कार्यकर्त्यांनी सोयगावात वाटप करण्यात आलेल्या साड्यांची मतदारांकडून होळी केली जात आहे. दरम्यान सत्तार हे छत्रपती संभाजीनगर चे पालकमंत्री होताच त्यांनी सोयगाव येथील कार्यालयात बांधकाम कामगारांची नोंदणी सुरू केली. काहींनी स्वतः केली तर भाजप च्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा नोंदणी केली परंतु सत्तारांच्या कार्यकर्त्यांनी बांधकाम कामगार आयुक्त यांच्याकडून सोयगाव तालुक्यात बांधकाम कामगार म्हणून नोंदणी झालेल्याची यादी हस्तगत करून शिवसेना कार्यालयात केवायसी करण्यासाठी बांधकाम कामगार विभागाचे कर्मचारी बसविले. कार्यालयातून यादीतील बांधकाम कामगारांना भ्रमणध्वनीद्वारे केवायसी करण्यासाठी कार्यालयात बोलविण्यात आले. नाईलाजास्तव बांधकाम कामगार हे शिवसेना कार्यालयात केवायसी करण्यासाठी जावे लागले. केवायसी झाल्यानंतर बांधकाम कामगारांना भांड्यांचे वाटप करण्यात आले. याप्रकारामुळे सत्तारांचा कट्टर कार्यकर्ता तथा नगरपंचायत शिवसेना गटनेते अक्षय काळे यांनी दक्षिण मुखी हनुमान या ग्रुपवर हिंदूंना उद्देशून, काही लोक साड्या वाटप ला विरोध करणारे काल भांडे, पेट्या वाटप कार्यक्रमात लाईन मध्ये उभे होते. अशी पोस्ट केल्याने मतदारांसह हिंदूंनी या पोस्ट विषयी संताप व्यक्त केला. सत्तार काही त्याच्या घरून भांडी देत नाही. आम्ही टॅक्स भरतो त्यातून आम्हाला योजना मिळतात उलट आम्ही भरलेल्या टॅक्सवर सत्तारांचे कुटुंब, नातेवाईक भ्रष्टाचार करून मोठे झाले अशी चर्चा लाभार्थ्यांमध्ये सुरू होती. या मुळे शहरात एकच खळबळ उडाली, सत्तारांचे कार्यकर्ते सोशल मीडियावर अशा पोस्ट करून सत्तारांची विधानसभा निवडणुकीत वाट बिकट करीत असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.



