सत्तारांच्या कार्यकर्ते असलेल्या वाहनातून पैशांची वाहतूक होत असल्याचा संशय!
आचारसंहिता पथक व पोलीस प्रशासन दबावाखाली, पारदर्शक निवडणुक वेशीला !
आचारसंहिता पथक व पोलीस प्रशासनाकडूनच सत्ताधारी आमदाराच्या प्रचारला हातभार ! संतप्त नागरिकांनी पकडलेली गाडीची थातूरमातूर तपासणी करून पोलिसांच्या सुरक्षेत गाडी रवाना. निवडणूक आयोग काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष.
सोयगाव दि. १२ (वृत्तसेवा) महायुतीचे उमेदवार असलेल्या अब्दुल सत्तार यांचे कार्यकर्ते ज्या वाहनातून सोयगाव कडे येत होते त्या वाहनात मोठ्या प्रमाणात पैसे जागरूक मतदारांना चाहूल लागली त्यानुसार गाडी संत गाडगेबाबा चौकात येताच वाहनात पैसे असल्याच्या संशयावरून शिवसेनेच्या (उबाठा) कार्यकर्त्यांनी संत गाडगेबाबा चौकात वाहन थांबविल्याने एकच गोंधळ उडाला होता. महायुतीचे व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. आचारसंहिता पथकाने वेळेवर तपासणी केली असती तर गोंधळ झालाच नसता. या संदर्भात CVIGIL या अप वर दु. १२:१४ वाजता तक्रार नोंदविली त्यानंतर काही वेळा नंतर आले त्यामध्ये दादाराव अहिरे यांनी बराच वेळ टाईमपास करीत वेळ काढूपणा केला त्यानंतर तणाव वाढत गेल्याचे पाहून तब्बल २० ते २५ मिनिटानंतर आचारसंहिता पथकातील इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर वाहनाची थातूरमातूर तपासणी करून वाहन सुरक्षित रवाना करण्यात प्रशासनाने सहकार्य केले. आचारसंहिता पथक व पोलीस प्रशासन हे नावालाच असल्याचा प्रत्यय यावेळी दिसून आला. आचारसंहिता पथक प्रमुख दादाराव अहिरे व सपोनि पंकज बारवाल यांनी वाहनाची पूर्णपणे चौकशी न करताच सोडून दिल्या असल्याने शहरात तणाव निर्माण झाला होता. दोन्ही अधिकाऱ्यांवर कामात कसूर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
दरम्यान एम. एच. २० जि. क्यु. ८००६ या गाडी मध्ये सत्तारांचे कार्यकर्ते प्रवास करीत होते. मतदारांना वाटण्यासाठी गाडीत पैसे असून ही गाडी सोयगाव च्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संत गाडगेबाबा चौकात गाडी अडवली. ही वार्ता वाऱ्यासारखी पसरल्याने संत गाडगेबाबा चौकात शेकडो कार्यकर्त्यांचा जमाव जमू लागला. महायुती आणि महाविकास आघाडी आमने सामने आल्याने चौकात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. झोपेत व दबावात असलेले आचारसंहिता पथक प्रमुख दादाराव आहेर, व सोयगाव पोलीस ठाण्याचे सपोनि पंकज बारवाल हे नेहमी प्रमाणे बघायची भूमिका घेत घटनास्थळी दाखल झाले. सदरील गाडीत अब्दुल सत्ताराचा नातेवाईक शे. जावेद व कार्यकर्ते बसले असल्याने आचारसंहिता पथक प्रमुख दादाराव आहिरे व सपोनि पंकज बारवाल यांची, त्यांना गाडीतून उतरावे वाहन तपासणी करायची आहे असे सांगण्याची हिम्मत झाली नाही. नागरिकांनी गोधंळ घातल्याने नाईलाजानस्तव वाहनातील इतर दोघांना उतरविले व चालक सत्तारांचा नातेवाईक शे. जावेद यांना गाडीतून उतरविण्याची हिम्मत झाली नाही. राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार संबंधित गाडीची चौकशी न करता सदरील गाडी दोघा अधिकाऱ्यांनी थातूरमातूर तपासणी करून सोडून दिली. यावरून सत्तारांची प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये दहशत असल्याचा प्रत्यय पुन्हा पाहायला मिळाला असल्याचा चर्चा नागरिकांमध्ये होती. आचारसंहिता पथकात असलेल्या कर्मचाऱ्यांनी जणू प्रेक्षकांसारखी बघायची भूमिका घेतली होती. दोघा अधिकाऱ्यांना सत्तारांच्या कार्यशैलीचा चांगलाच अनुभव असल्याने निवडणुकीची पारदर्शकता वेशीला टांगली असल्याचे दिसून येत आहे. निवडणूक दरम्यान गटविकास अधिकारी, तहसीलदार व पोलीस ठाणे प्रमुखाची बदली न झाल्याने निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून आचारसंहिता पथक प्रमुख दादाराव आहिरे व सपोनि पंकज बारवाल यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणीची चर्चा घटनास्थळी ऐकावयास मिळाली. या प्रकरणी राज्य निवडणूक आयोग व जिल्हा निवडणूक विभाग काय कार्यवाही करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.



