सोयगाव तालुक्यात जनावरे चोरीचे सत्र वाढले…. पोलिसांची भूमिकेवर प्रश्नचिन्ह…

सोयगाव दि. १२ (प्रतिनिधी) सोयगाव पोलिसांची गस्तीची पुढे वाहन व माघारी अज्ञात चोरट्यांनी उमर विहिरे शिवारात शेडचे कुलुप तोडून दोन गोवंश चोरी केल्या ची घटना मंगळवारी रात्री एक ते दोन वाजेच्या सुमारास उघड झाली आहे. त्यामुळे सोयगाव हद्दीत सलग दुसऱ्या दिवशीही झालेल्या जनावरें चोरीच्या घटनेमुळे पोलिसांचे टेन्शन वाढले असून मात्र सलगच्या चोरीचा संत्रांमुळे तालुक्यातील नागरिकांनी पोलिसांच्या निष्क्रियतेवर प्रश्न चिन्हे निर्माण केले आहे.
सोयगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सलग दुसऱ्या दिवशीही मंगळवारी रात्री उमर विहिरे शेती शिवारातून शेतकऱ्याच्या शेतातील शेडचे कुलुप तोडून दोन गोवंश चोरी झाल्याचा प्रकार बुधवारी पहाटे उघडकीस आला आहे. सोमवारी रात्री गोंदेगाव व वनगाव शिवारातून तीन बैल चोरी गेल्याची घटना घडली होती. दरम्यान हद्दीतील चोऱ्या वाढुनही पोलिसांची पकड ढिली झाल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांनी प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे. दरम्यान सोयगाव हद्दीत महिना भरापासून सर्रासपणे जनावरे चोरीचे प्रकार उघड होत आहे. परंतु पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे पशुपालक चिंताग्रस्त झाले आहे
चोरट्यांनी आखला प्लॅन —
जनावरें टोळीच्या चोरट्यांनी पोलिसांवरच पाळत ठेवून सोयगाव पोलिसांचे रात्रीच्या गस्तीची वाहन घोसला गावापासून निघून जाताच अज्ञात चोरट्यांनी उमर विहिरे शिवारात सुधीर पाटील यांच्या गट क्र. – ३९ मधील शेड चे कुलुप तोडून दोन गोवंश चोरी करून पोबारा केला. दरम्यान घोसला गावाजवळ ज्ञानेश्वर गवळी यांच्या शेतात त्यांनी दुसरा चोरीचा प्रयत्न केला मात्र शेतकरी जाग आल्या मुळे त्यांनी वाहन घेऊन त्या ठिकाणवरून पोबारा केला शेतकरी ज्ञानेश्वर गवळी यांनी घोसला ग्रामस्थाना सतर्क केले असता चोरट्यांचे वाहन अडविण्यासाठी नांदगाव तांडा येथे तातडीने काही नागरिकांनी साखळी केली मात्र अज्ञात चोरट्यांनी ही साखळी तोडून भरधाव वाहन घेऊन पळाले तिडका गावाजवळ पोलिसांचे गस्तीची वाहन उभे असतांना पोलिसांना ही गुंगारा देवून चोरट्यांनी चाळीसगांव कडे पळ काढला मात्र सोयगाव हद्दीत वाढत्या चोऱ्या मुळे पोलिसांना चोरट्यांनी आव्हान दिले आहे. सायंकाळी उशिरा शेतकरी सुधीर पाटील यांनी सोयगाव पोलीस ठाण्यात गोवंश चोरीची तक्रार दिली आहे.
तालुक्यातील अवैद्य धंद्यासोबतच चोरीचे प्रमाणही वाढले…
सोयगाव पोलीस ठाणे अंतर्गत बनोटी चौकी हद्दीत सर्रासपणे सट्टा, पत्ता, जुगार, खेळण्याचे दुकाने थाटले आहे तसेच मुख्य रस्त्यांवर देशी, विदेशी दारू अवैद्य पणे पोलिसांच्या अर्थपूर्ण संबधातून विक्री केली जात आहे. या संदर्भात कोणीही तक्रार करा काहीही फरक पडत नाही. कारण पोलिसांना त्यांच्या वेतना पेक्षा जास्त पैसा हे अवैद्य धंदे वाले देत असल्याची चर्चा बनोटी परिसरात चालू आहे. सोयगाव पासून ते मोहळाई पर्यंत प्रत्येक गावात सोयगाव पोलिसांच्या आशीर्वादाने अवैद्य रित्या देशी, विदेशी दारू मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. तसेच तालुक्यात गुटखा विक्री हि मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी जात आहे. तसेच बनोटी परिसरात पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावरच जुगार खेळल्या जात आहे. याकडे पोलीस जाणीवपूर्वक आर्थिकदृष्ट्या दुर्लक्ष करून हितसंबंध जोपासत आहे. पोलीसच याकडे दुर्लक्ष करीत असल्याने परिसरात अवैद्य धंद्यासोबतच चोरीचे प्रमाण देखील वाढले आहे. याकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस आयुक्त प्रविण पवार, ग्रामीण पोलीस अधिक्षक विनयकुमार राठोड यांनी लक्ष देण्याची आवश्यकता असल्याची चर्चा परिसरात नागरिकांमधून होत आहे.



