आज आनंदऋषीजी हॉस्पिटल बीड येथे मोफत किडनी विकार शिबिर.

बीड दि. २० (वृत्तसेवा) जैन सोशल फेडरेशन अहमदनगर संचलित, बीड येथील जालना रोड, शाहु बँकेजवळ असलेले आनंदऋषीजी हॉस्पिटल बीड येथे आज दि. २१ मे बुधवार रोजी १२ ते २ अंगावर सुज येणे, लघवी कमी / लाल होणे, किडनी जंतू संसर्ग, डायलेसिस इ. उपचार. किडनी ट्रान्स्प्लांट विषयक मार्गदर्शन. व तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. वैद्यकीय सेवा दिवसेंदिवस महाग होत असल्याने बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना कमीत कमी पैशात सेवा उपलब्ध व्हावी या उदात्त हेतुने शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी किडनी आजार असणार्या रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन सकल जैन समाज बीडच्यावतीने करण्यात आले आहे. या शिबीरात डायलेसिस असणार्या गरजू रुग्णांना महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत डायलेसिस मोफत केले जातील. शिबीरात तज्ञ डॉक्टर्स – नेफ्रॉलॉजीस्ट डॉ. गोविंद कासट व तज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी व उपचार करणार आहेत. आनंदऋषीजी हॉस्पिटल रुग्णसेवेमध्ये राज्यामध्ये सुप्रसिध्द आहे. आनंदऋषीजी रुग्णालयात ०१ हजार ३०० पेक्षा जास्त कर्मचारी, विविध फिल्डमध्ये २५० पेक्षा अधिक डॉक्टर सेवा करत आहेत.
किडनी विकार शिबीरात तपासणी करण्यासाठी नोंदणी फीस मोफत ठेवण्यात आलेली आहे. नोंदणीसाठी मो. ८२६२००९०९१ मोबाईल नंबर वर संपर्क साधावा. वेळे अभावी नोंदणी करु न शकलेल्या रुग्णांची देखील तपासणी करण्यात येणार आहे. दि. २१ मे बुधवार रोजी १२ ते २ या वेळेत मोफत किडनी विकार शिबिर, अहमदनगर येथील तज्ञ डॉ. नेफ्रॉलॉजीस्ट गोविंद कासट व त्यांचे सहकारी डॉक्टर रुग्णांची तपासणी करणार आहेत. संत आनंदऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने गेल्या २० वर्षापासून हॉस्पिटल कार्यरत आहे. तरी बीड शहरातील व पंचक्रोषीतील किडनी विकार रुग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन बीडचे विश्वस्त व समस्त जैन समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.


