काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा रेशनचे धान्य संतप्त ग्रामस्थांनी पकडले ;- जरंडी गावातील घटना..

सोयगाव दि. २९ (वृत्तसेवा) चार चाकी वाहनाद्वारे काळ्या बाजारात रेशन चा गहू, तांदूळ विक्रीसाठी घेऊन जाणारे अकरा क्विंटल धान्य संतप्त ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळी अकरा वाजता चार चाकी वाहन अडवून जरंडी गावाजवळ पकडले दरम्यान वाहनांच्या मागे पुन्हा तीन मोटारसायकल वरही धान्य आढळून आल्या मुळे सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे..
सिल्लोड तालुक्यात काळ्या बाजारात रॉशन चे गहू तांदूळ धान्याच्या गोण्या विक्रीसाठी घेऊन जरंडी गावाजवळ संतप्त ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडून ग्रामपंचायतीच्या स्वाधीन केले. दरम्यान ग्रामपंचायतने स्थानिक पंचनामा करून उपसरपंच संजय पाटील, माजी पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे, दिलीप पाटील यांनी सोयगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली याप्रकरणी सोयगाव पोलिसांनी वाहनांसह तीन गोण्या गहू, सात गोण्या तांदूळ, अंगणवाडी पोषक आहार – दोन गोण्या, एक गोणी ज्वारी असे एकूण अकरा क्विंटल रॉशनचे धान्य जरंडी गावातून जप्त केले आहे. या घटनेमुळे सोयगाव तालुक्यात उलट सुलट चर्चाना उधाण आले आहे. जरंडी गावाकडून सिल्लोड कडे ओमीनी गाडी क्र. – एम. एच. ४३ व्ही. ६२८८ मध्ये व मोटारसायकल क्र. एम. एच. २० बी. व्ही. ००८२, एम. एच. २० ए. व्ही. ९४८२ आणि एम. एच. २० ए. यु. ९६७९ काही गोण्या दुचाकी वर रंगेहाथ पकडून अफरोज हमीद शेख, समीर शेख हमीद, मिरज शेख खलील, जुबेर शेख (चारही रा. शिवना ता. सिल्लोड,) इकबाल तडवी (रा. निंबायती ता. सोयगाव), शेख नाजीम शेख चांद (रा. सोयगाव) व इतर चार अश्या दहा जणांच्या ताब्यातून रंगेहाथ पकडले दरम्यान सोयगाव पोलिसांना घटनेची माहिती देताच घटनास्थळी धाव घेत सदर रेशन चे गहू तांदूळ असे अकरा क्विंटल धान्य सोयगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हस्तगत केले. अद्याप सोयगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद घेतली नव्हती.

पुरवठा विभाग झोपेत….
एकीकडे तालुक्यातील अनेक शिधापत्रीका लाभार्थी हे रेशन पासुन वंचित असतांना इतक्या मोठ्या प्रमाणात धान्य काळ्या बाजारात जात आहे. पुरवठा विभागाचे ना. तहसीलदार काकासाहेब साळवे यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता मी छ. संभाजीनगर ला मिटींग साठी आहे. त्यामुळे मला माहित नाही, मी तलाठी यांना विचारतो व तपास करुण कळवतो. या प्रमाणे उत्तर पुरवठा विभागाकडून देण्यात आले. तसेच याबाबत उपस्थित नागरिक व उपसरपंच संजय पाटील यांनी तहसीलदार मनीषा मेने व सोयगाव पोलीस ठाण्यात भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली. परंतु राजकीय दबावाला बळी पडणाऱ्या तहसीलदार मनीषा मेने यांनी दखल घेतली नाही. तर तब्बल चार तासानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले व पुरवठा विभाग यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवु शकला. त्यावेळी नागरिकांमधून एकच सुर निघाला की तहसील कार्यालयाने हप्ते बांधले असेल त्यामुळे सोयगाव तहसील, पुरवठा विभाग हा झोपला आहे की झोपेचे सोंग घेत आहे. ह्या स्वरुपात जरंडी गावात चर्चा रंगली आहे.



