आपला जिल्हामहाराष्ट्र

लोकशाही दिनाला तहसीलदार यांच्या सह प्रमुख अधिकारीच गायब, तक्रारकर्त्यांची कारवाईचीच पुन्हा तक्रार..

सोयगाव दि. २१ (वृत्तसेवा) महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी होत असलेल्या लोकशाही दिनी सोमवारी (दि.२१) तालुका प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनीच पाठ फिरवल्याने तहसिल कार्यालयात सोमवारी झालेल्या लोकशाही दिना चा बोजवारा उडाला दरम्यान कोणीच येत नसल्याचे पाहून ऐनवेळी दुपारी दोन वाजता नायब तहसीलदार संजय गांधी व पुरवठा अधिकारी यांनी हा औपचारिकरित्या लोकशाही दिन घेतला त्यामुळे लोकशाही दिनात तक्रार कर्त्यांनी प्रशासन विरोधात संताप व्यक्त केला.
तहसीलदार मनीषा मेने – जोगदंड यांच्यासह गटविकास अधिकारी दादाराव अहिरे, वनपरीक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ, पोलीस निरीक्षक सोयगाव, या प्रमुख अधिकाऱ्यांनी दांडी मारली तर गटशिक्षणाधिकारी, कृषी, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, प्रकल्प विभाग आदी यंत्रणांचा प्रतिनिधी या लोकशाही दिना साठी उपस्थित होते. दरम्यान तक्रारदार संदीप इंगळे यांनी जनहितार्थ व गौण खनिजाच्या माध्यमातून तहसीलदार व महसुलचे झिरो पासून ते नायब तहसीलदार यांच्यापर्यंत गौनखनिज माफियांचे असलेले लागेबांधे यामुळे सोयगाव तालुक्यात शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावला जात असल्याने यावर आळा बसावा यासाठी लतीफ पठाण उपविभागीय अधिकारी सिल्लोड, दिलीप स्वामी जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर, विनयकुमार राठोड ग्रामीण पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे लेखी तक्रार करून देखील चौकशी करून कारवाई करण्यात आली नसल्याने तहसीलदार यांच्याकडे लोकशाही दिनी न्याय मिळावा यासाठी लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र तहसीलदार मनीषा मेने – जोगदंड यांनी लोकशाही दिनी दांडी मारल्याने तक्रार कर्त्यांनी संताप व्यक्त केला होता. लोकशाही दिनी इतर शासकीय कार्यालयातील अधिकारी हजर राहत नसल्याने न्याय मिळण्यास चकरा माराव्या लागत असून आर्थिक भुदंड सोसावा लागत आहे. मात्र लोकशाही दिनी गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जात नसल्याने तहसिल कार्यालयात लोकशाही दिन हा नावापुरताच आयोजित केला जात आहे. सोयगाव तहसिल कार्यालयाच्या अनेक लेखी तक्रारी करून देखील जिल्हाधिकारी चौकशी करून तहसीलदार मनीषा मेने – जोगदंड यांच्यावर कारवाई करण्यास धजावत नसल्याने सोयगाव तालुका वासीयांना तहसिल कार्यालयात न्याय मिळत नसल्याने लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करून देखील उपोषण कर्त्यांची तहसीलदार यांच्याकडून खिल्ली उडवली जात आहे. पालकमंत्री व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोयगाव तालुक्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी संदीप इंगळे यांनी केली आहे.

लोकशाही दिनी सीसीटीव्ही व बायोमेट्रिक चालू करण्याची मागणी.

सोयगाव तालुक्यातील शासकीय कार्यालयातील सीसीटीव्ही व बायोमेट्रिक बंद असल्याने अधिकाऱ्यांना याचा चांगलाच फायदा होत असतो. मुख्य म्हणजे तालुक्याचे प्रमुख असलेले तहसील कार्यालयातीलच अधिकारी व कर्मचारी हे नेहमीच उशिरा येऊन कार्यालयीन वेळ संपण्याअगोदरच घरचा रस्ता पकडत असतात. अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक सीसीटीव्ही व बायोमेट्रिक बंद केले असून ते तात्काळ सुरु करण्यात यावे असा प्रश्न लोकशाही दिनी संदीप इंगळे यांनी उपस्थित केला असता ना. त. बहुरे व ना. त. साळवे यांनी सांगितले कि दोन दिवसात सीसीटीव्ही व बायोमेट्रिकचालू करण्यात येईल असे सांगितले.

Related Articles

Back to top button