प्रा. भूषण संजय देशमुख विदर्भ भूषण पुरस्काराने सन्मानित.

नागपूर दि. २० (वृत्तसेवा) नागपूर येथे विविध क्षेत्रात कार्यरत विदर्भ स्तरावरील विविध पुरस्काराचे नामांकन करण्यात आले होते. त्यामध्ये विदर्भातील १०० च्या वर सामाजिक कार्यकर्ते, खेळाडू, प्रशिक्षकानी नामांकन केले होते. त्यामध्ये विदर्भातील २० लोकांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये चंद्रपूर येथील पठाणपुरा वार्ड रहिवासी प्रा, भूषण संजय देशमुख यांची निवड करण्यात आली. त्यांना नागपूर येथील वित्त नियोजन विधी व न्याय राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य आशिषजी जयस्वाल यांच्या हस्ते विदर्भ भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यापूर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूरच्या वतीने अमूल्य अशा या योगदान बद्दल महाराष्ट्र शासन गुणवंत किडा मार्गदर्शक पुरस्काराने सन २०१९ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय भाऊ वडट्टीवार यांच्या हस्ते देण्यात आलेला होता.
त्यांची क्रीडा क्षेत्रातील कामगिरी पुढील प्रमाणे आहे. शालेय जिल्हा विभागीय राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरीय स्पर्धेमध्ये तर आंतर विद्यापीठ अखिल भारतीय विद्यापीठ संघटनेमार्फत जिल्हा व राज्य व राष्ट्रीय पावर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये प्रशिक्षक म्हणून कार्य करणे, खेळाडूंना प्रोत्साहन देणे, खेळाडू करिता उन्हाळी प्रशिक्षण क्रीडा शिबिर घेणे व व्यायाम करिता लागणारे किट स्वखर्चातून उपलब्ध करून देणे. बॉडी बिल्डिंग, पावर लिफ्टिंग क्रिकेट, कबड्डी, व कुस्ती स्पर्धेचे आयोजन करणे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांकरिता ग्रीन जिमचे ओपनिंग करिता शासनाला करणे पाठ पुरवठा करणे व व्यायामाचे साहित्य उपलब्ध करून देणे. त्यांच्या सर्वांगीण विकास करिता मार्गदर्शन करीत असतात त्यांनी सन २०१७ साली पठाणपुरा व्यायाम शाळा चंद्रपूर येथे दिव्यांग खेळाडू करिता हॅंडीकॅप प्लेयर मेकिंग सेंटरची स्थापना केली. खेळाडूंना योग्य ते मार्गदर्शन करून प्रशिक्षण देऊन जिल्हा व राज्य स्तरावर पदके प्राप्त करून चंद्रपूर जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रात लौकिक केलेले आहे.
त्यांच्या कार्याचा आढावा घेत विदर्भ क्रीडा आयोजन समितीने त्यांना विदर्भ क्रीडा भूषण सन २०२५ चा पुरस्कार जाहीर केला. त्यांना दि. १३ एप्रिल रोजी आरडी टेम्पल सिव्हिल लाईन येथे राज्यमंत्री माननीय आशिष जयस्वाल यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला व त्यादरम्यान अशीच कामगिरी पुढे पण क्रीडा क्षेत्रात नियमित चालू ठेवावी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहे. अशा शुभेच्छा देण्यात पण आल्या त्यांना त्यांच्या मित्र परिवारातून सामाजिक कार्यकर्ते गणेशभाऊ बनकर, सिविल कॉन्ट्रॅक्टर सागर चौधरी, दिपक बानकर डॉ. आंबेडकर महाविद्यालय प्रा. चरित्र नगराडे , प्रा. पवन खनके, प्रा. संजय पाटील, प्रा. आशिष दरेकर, प्रा. विक्री पेटकर, राज्य कुस्ती प्रशिक्षक धर्मशील काटकर, सुहास बनकर, चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय पावर लिफ्टर, पंकज बेले,दर्शन झाडे, विष्णू वर्धन येरनी, अमोल आवडे, अनिरुद्ध तपासे, केमराज हिवसे त्यांचे प्रेरणास्थान, वसंत भाऊ देशमुख, हृदयरोग तज्ञ डॉ. विश्वास झाडे, रमेश भाऊ भुते, रामदास बानकर, अजय भाऊ वैरागडे, अरविंदजी चवरे, मनोज भाऊ झाडे, राजेश भाऊ बेले, सुभाष भाऊ आदमाने, मयूर बानकर, ओंकार तपासे, कृष्णा देशमुख, नमन इटनकर यांच्या हस्ते शुभेच्छा देण्यात आल्या.


