आमखेडा येथे अखंड हरिनाम किर्तन सप्ताह व संगीतमय श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळा आयोजन….

सोयगाव दि. ३१ (वृत्तसेवा) आमखेडा येथे विठ्ठल रुख्मिणी मंदिर येथे संगीतमय श्रीराम कथा व ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. भगवान पांडुरंगाच्या कृपेने व प. पु. वै. रामकृष्ण दादा नाईक गुरुजी यांच्या आशीर्वादाने तसेच ह. भ. प. भागवत महाराज गाडेकर व ह.भ. प. रविंद्र महाराज परेराव यांच्या कुशल मार्गदर्शनाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दि. ३१/३/२०२४ रविवार पासून ते दि. ०७/०४/२०२४ रविवार पर्यंत अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व संगीतमय श्रीराम कथा श्री. विठ्ठल रुक्माई मंदिर संस्थान तर्फे आयोजित केलेले आहे. संगीत श्रीराम कथा प्रवक्ता तथा युवा कीर्तनकार ह. भ. प. निवृत्ती महाराज मोहने आमखेडा यांच्या सुमधुर वाणीतून होणार आहे. तसेच या संगीतमय श्रीराम कथेची सेवा सोयगाव शहरातील प्रसिद्ध व्यापारी लक्ष्मी अलंकार चे मालक विष्णूशेठ गोविंदराव दुसाने यांच्यातर्फे सेवा आयोजित केलेली असल्याचे आयोजकांनी सांगितले. या सप्ताहात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या धार्मिक कार्यक्रमाचा भाविकांनी व भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान ग्रामस्थ मंडळी शिवाजीनगर आमखेडा यांच्या तर्फे करण्यात आले आहे. तसेच दि ३१ रविवार ते दि. ७ रविवार दरम्यान दररोज सकाळी पहाटे ५ ते ६ काकडा आरती, सकाळी ६ ते ७ विष्णुसहस्रनाम, दुपारी १ ते ४ संगीतमय श्रीराम कथा, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, रात्री ८:३० वाजता ते १०:३० पर्यंत कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन सोहळा. 
दि. ३१ रविवार रोजी विदर्भ रत्न ह. भ. प. नारायण महाराज ढासाळेकर.
दि. ०१ सोमवार रोजी युवा कीर्तनकार ह. भ. प. जान्हवीताई सोनवणे
दि. ०२ मंगळवार रोजी बालकीर्तनकार ह. भ. प. अयोध्याताई सुलताने
दि. ०३ बुधवार रोजी विनोदाचार्य ह. भ. प. प्रल्हाद महाराज उशीर
दि. ०४ गुरुवार रोजी वारकरी भुषण शिरीष महाराज वाघाडीकर
दि. ०५ शुक्रवार रोजी भागवताचार्य ह. भ. प. मंगेश महाराज वराडे
दि. ०६ शनिवार रोजी भागवर्ताचार्य ह. भ. प. शिवाजी महाराज तळेकर
दि. ०७ रविवार रोजी ह. भ. प. निवृत्ती महाराज मोहने यांचे सकाळी १० ते १२ वाजता काल्याचे किर्तन होईल. तसेच त्यांनंतर दुपारी ०१ ते ०४ वाजेदरम्यान महाप्रसादाचे आयोजन श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थांन तर्फे करण्यात करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. त्यामुळे परिसरातील सर्व भाविकांनी या अखंड हरिनाम किर्तन सप्ताह व संगीतमय श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे लाभ घेण्याचे आवाहन श्री. विठ्ठल मंदिर संस्थान तर्फे करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी विशेष सहकार्य श्री. महामुनी अगस्ती महाराज वारकरी शिक्षण संस्था आमखेडा सोयगाव यांचे लाभणार आहे.



