आपला जिल्हाक्राईममहाराष्ट्र

जरंडी च्या चिमणापूर पाझर तलावातून रॉयल्टी पेक्षा जास्त उपसा करून मुरुमाची सर्रास वाहतूक.

भरारी पथक माफियांच्या दावणीला तर अधिकाऱ्याच चांगभलं.

सोयगाव दि. ०१ (वृत्तसेवा) सोयगाव तालुक्यातील जरंडी शिवारातील चिमणापूर पाझर तलावातून सर्रासपणे मुरूम उपसा सुरू असून रॉयल्टीपेक्षा जास्त मुरूम भरून अन्य ठिकाणी वाहतूक करण्याचा गोरखधंदा सुरू आहे. यामधून शासनाचा तालुक्यात कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडत आहे. अवैध गौण खनिज मुरुमाचा धरणातून सर्रास उपसा सुरू असल्याची माहिती मिळताच सोयगाव महसूलचे पथक शुक्रवारी दुपारी तीन वाजता धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभे होते. मुरूम उपसा करणारे जेसीबी व ट्रॅक्टर चालक घटना स्थळवरून गायब झाली असल्याची चर्चा करीत होते. महसुलच्या भरारी पथकातील तलाठी वाडकर व देवतुळे हे रस्त्यातच उभे राहून घटनास्थळी कुणीच नाही. सांगत परत निघत असताना दोन पत्रकारांना धरणाकडे जात असल्याचे पाहून वाडकर व देवतुळे हे अवैधरीत्या गौण खनिज वाहतूक करणाऱ्या सोबतच दुचाकीवरून धरणात घटनास्थळी दाखल झाले. यामुळे जेसीबी व ट्रॅक्टर पसार करण्यात दोघांनी महत्वाची भूमिका बजावल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये रंगली होती. धरणाच्या आजूबाजूला वन विभागाचे जंगल असून या जंगलात जेसीबी व ट्रॅक्टरांचा वावर नेहमीचा सुरू असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे जंगलातील वनसंपदेचे अस्तित्व देखील धोक्यात येत आहे. याकडे अद्यापही वनविभागाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली दिसुन येत नाही. दरम्यान चिमणापूर धरणातील मुरुमाचा उपसा करून गट क्र. – २९८ मध्ये संकलित करण्यात येत होता. महसूल च्या पथकाने गट क्र. २९८ मध्ये दाखल होऊन त्या ठिकाणी चारशे ब्रास मुरुमाचा विनापरवाना उपसा झालेल्या मुरुमाचा पंचनामा केला असता त्या ठिकाणी तब्बल चारशे ब्रास मुरुमाचा उपसा झाल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.

जरंडी च्या चिमणापूर धरणाच्या पात्रातून शुक्रवारी सकाळ पासून दुपारी दोन वाजेपर्यंत चक्क चारशे ब्रास मुरूमचा उपसा करण्यात आला आहे. संबंधित ठेकेदाराने शासनाच्या महसूल बुडवून सर्रासपणे मुरुमाचा उपसा करण्यात येत आहे. या प्रकरणी महसूल पथक प्रमुख महेंद्र वाडकर, शंकर देवतुले आदींच्या पथकाने चारशे ब्रास मुरूमचा उपसा केला असल्याचा पंचनामा शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता तहसीलदार मनिषा मेने जोगदंड यांच्याकडे सादर केला आहे.

रॉयल्टी वीस ब्रासची उपसा मात्र चक्क चारशे ब्रास.

दरम्यान संबंधित ठेकेदाराने या धरणाच्या पात्रातून वीस ब्रास मुरुमाची रॉयल्टी काढली होती मात्र एका दिवसात चारशे ब्रास मुरुमाचा उपसा केला आहे.

-जरंडी ग्रामविकास अधिकाऱ्याचा अजब फंडा..

-डोंगरात असलेल्या पाटबंधारे विभागाअंतर्गत असलेल्या चिमणापूर धरणातून मुरूम उत्खनन करून वाहतूक करण्यासाठी जरंडीचे ग्रामविकास अधिकारी सुनिल मंगरूळे यांनी ठेकेदाराला नाहरकत प्रमाणपत्र दिल्याने ठेकेदाराने महसूल ला वीस ब्रास मुरूम वाहतुकीची रॉयल्टी भरल्याने महसूल कडून परवानगी देण्यात आली होती. मालमत्ता पाटबंधारे विभागाची नाहरकत प्रमाणपत्र दिले ग्रामविकास अधिकाऱ्याने या शासनाच्या अधिकाऱ्यांच्या अनागोंदी व आर्थिक व्यवहारातून महसूल चा कोट्यवधी रुपयांचा महसूल डल्ला मारीत आहे.

प्रशासनाचे अधिकारी काहीच करु शकत नाही.

भरारी पथक मधील तलाठी वाडकर, तलाठी देवतुले, शिपाई संतोष नवगिरे, संजय नावकर हे पंचनामा करुन गट क्र. २९८ च्या बाहेर पडत नाही तर घटनास्थळी उपस्थित नागरिकांमधुन एकच चर्चा निघाली की “डरो मत कोही कुछ नही कर सकता, ….भाई, सत्तार का आदमी है, सत्तार साहेब के ऑफिस से कॉल आयगी और सब ठिक हो जायेगा” त्यामुळे अद्याप देखील अधिकारी व कर्मचारी हे दहशतीत काम करीत असल्याची देखील चर्चा परिसरात रंगली होती.

Related Articles

Back to top button