महाराष्ट्र
गावस्तरावरील विकास कामे गुणवत्ता पूर्ण करा. – पुलकित सिंह

चंद्रपूर दि. ०१ (वृत्तसेवा) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी नुकताच गोंडपिंपरी तालुक्यातील दौरा केला असून, गाव स्तरावर चालणाऱ्या विविध विकास कामांची पाहणी केली. यावेळी गावात उभारण्यात येणारी विविध बांधकामे विकास कामे गुणवत्ता पूर्ण झाली पाहिजे. असे निर्देश यावेळी यंत्रणेतील अधिकारी यांना देण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी गोंडपिपरी तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन विकास कामाची पाहणी केलेली आहे .यावेळी करंजी गावात ला भेट देऊन, प्रभाग संघ कार्यालयात भेट दिली .या ठिकाणी महिला बचत गटासोबत चर्चा करण्यात आली. प्रभाग संघाचे नाविन्यपूर्ण उपक्रम दालमिल व मोबाईल राईस मिल ला भेट दिली. मोबाईल राईस मिल असे प्रभाग संघाचे नाव देण्यात आले. जिल्ह्यातील प्रभाग संघांनी व्यवसाय वाढीकरता प्रयत्न करावे असे निर्देश यावेळी देण्यात आले. याशिवाय यावेळी विठ्ठल वाडा सकमूर या गावात मत्स्यबीज संवर्धन केंद्रास भेट देऊन ,कामकाजाची पाहणी केली.
ग्रामपंचायत वडोली येथील नरेगा अंतर्गत बळीराजा पांदन रस्ता, वैयक्तिक सिंचन विहीर रेशीम उद्योग याची पाहणी करून, शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. दरूर येतील खेलो चांदा अंतर्गत तयार असलेल्या क्रीडांगणाची पाहणी केली . क्रिडांगणात लाल माती भरण्याचे निर्देश देण्यात आले. ग्रामपंचायत धाबा अंतर्गत चालू असलेल्या घरकुलाची पाहणी केली. घरकुल सर्वेक्षण 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. वडोली गावातील शाळेला भेट देऊन शाळेच्या प्रयोगशाळेची पाहणी केली. गावात चालू असलेले जलशुद्धीकरण केंद्राचे सोलर पॅनलचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. गंगाराम तळोधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकामाची पाहणी करून कामात उत्तम दर्जा ठेवून बांधकाम मुदतीत पूर्ण करा. असे निर्देशित केले. संभाव्यपुराचा धोका लक्षात घेऊन तारडा, वडोली, खुलता ,सकमूर, धाबा हिवरा, करंजी या गावांची मान्सून पूर्वतयारी करण्याचे निर्देश दिले. मंगल पेठ येथील अंगणवाडी ला भेट देऊन, बालकाची आरोग्याची तपासणी, पोषण आहार ,लसीकरण, नियमित होईल याची दक्षता घ्यावी .असे संबंधित यंत्रणेला निर्देशित केले. गाव भेटी दरम्यान गोंडपिपरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण चनफणे व विविध यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.


