रिपब्लिकन सेना सोयगाव तर्फे नगरपंचायत समोर आमरण उपोषण…

सोयगाव दि. ०४ (वृत्तसेवा) शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मधील विविध मागण्यासंदर्भात रिपब्लिकन सेना सोयगाव तालुकाध्यक्ष अंकुश पगारे यांनी आज दि. ०४ सोमवार पासून आमरण उपोषण सुरु केले असून दिवसभरात प्रशासनाचे अधिकाऱ्यांनी उपोषण स्थळाकडे पाट फिरवली. नगरपंचायत कार्यालय सोयगाव तर्फे डॉ. आंबेडकर नगर परिसरात दुर्गंधीयुक्त वातावरण होत असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. तसेच ग्रामपंचायत अस्तिवात आल्या पासून ते सोयगाव ग्रामपंचायत चे नगरपंचायत मध्ये वर्ग झाल्या पासून सोयगाव शहरात दलित वस्तीसाठी किती निधीची वार्षिक तरतूद करण्यात आली. तसेच त्यातून प्रत्येक वर्षी निधीचा कोणत्या प्रकारे खर्च करण्यात आला. यासंदर्भात अंकुश पगारे यांनी जन माहितीचा अधिकार अतर्गत माहिती देखील मांगितली होती. माहिती देण्यास देखील मुख्याधिकारी हे टाळाटाळ करीत असल्याचे पगारे यांनी सांगितले. तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर दि. १४ एप्रिल ला सन २०१६ पासून दरवर्षी जयंती उत्सव साठी शासन किती निधीचा पुरवठा करते त्याची कशा प्रकारे वापर केला जातो याची देखील माहिती मिळाली नसल्याने व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोरील व शेजारील गटारी वरील अतिक्रमण काढून येथील दुकाने व टपऱ्या अठविणे व गटारी पूर्णपणे मोकळीक करणे असे झाल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व बौद्ध वस्तीत पावसाळी घाण घुसणार नाही. अतिक्रमण काढण्यासाठी कोणत्याही व्यक्तीने विरोध करेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विकास कामासाठी शासनाने किती निधीचा पुरवठा करत असते सन २०१६ ते सन २०२३ पर्यंत आपण निधीतून कोणता विकास केला त्याची सविस्तर माहिती व निधीतून काम केलेल्याचे अंदाजपत्रक (इस्टिमेट) माहिती देण्यात यावी तसेच इतर मागण्यासाठी अंकुश मधुकर पगारे रिपब्लिकन सेना सोयगाव तालुकाध्यक्ष दि. ०४ सोमवार रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून न्याय मिळेपर्यंत मी आमरण उपोषण बसले आहे.
उपोषणाला महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास संघटनेचा जाहीत पाठींबा…
सोयगाव नगर पंचायत समोर सुरु असलेले उपोषण सोयगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबडेकर पुतळ्याच्या परिसराच्या योजने बाबत व परिसरातील विकासाबाबत आमरण उपोषणास बसलेले अंकुश पगारे यांच्या मागण्या न्याय हक्काच्या आहे. त्या वरील उपोषणाची दखल घ्यावी व उपोशानातील मागण्या त्वरित सोडवाव्या अन्यथा संघटनेच्या माध्यमातून पाठींबा देऊन उपोषणास सहभाग घ्यावा लागेल असे उपोषण स्थळी महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास संघटनेचे संस्थापक तथा प्रदेश अध्यक्ष अफसर ए. तडवी, बनेखॉ पठाण, डॉ. समीर तडवी यांनी लेखी पत्र देऊन पाठींबा दिला आहे.



