आपला जिल्हाक्राईम

सोयगाव वनविभाग ऍक्शन मोडवर, अवैध वृक्षतोड करणाऱ्यावर धडक कार्यवाही.

लाकडांची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त..

सोयगाव दि. १४ (वृत्तसेवा) तालुक्यातील बनोटी वन परिमंडळातील मौजे उमरविहिरे येथील महादेव मंदिराजवळील पाणंद रस्त्याने एक ट्रॅक्टर अवैधरीत्या लाकडांची वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती दि. १३ शनिवार रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी सोयगाव यांना मिळाली. सदरील माहितीच्या अनुषंगाने अनिल मिसाळ वन परिक्षेत्र अधिकारी सोयगाव (प्रा.) यांनी तात्काळ दखल घेत वनपाल बनोटी यांना तात्काळ एक पथकासह सदर ठिकाणी रवाना होण्याचे आदेश दिले. त्यानुसार वनविभागाच्या पथकाने सापळा रचून मौजे उमरविहिरे येथील महादेव मंदिराच्या पाठीमागे असलेल्या पाणंद रस्त्याने अवैध लाकडांची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला. सदर ट्रॅक्टर मालकासह चालक यांच्या विरोधात वनगुन्हा नोंदवण्यात येऊन सदर ट्रॅक्टर वन विभागाने ताब्यात घेतला आहे. सदर कार्यवाही श्रीमती ए. चव्हाण उप वनसंरक्षक छत्रपती संभाजीनगर, ए . बी. गायके सहाय्यक वन संरक्षक सिल्लोड प्रा. व अनिल मिसाळ वन परिक्षेत्र अधिकारी सोयगाव यांच्या मार्गदर्शनखाली एम. एम. अली वन परिमंडळ अधिकारी बनोटी, एन. ए. मुलताने वनरक्षक घोसला, जी. टी. नागरगोजे वनरक्षक वेताळवाडी पू. , व्ही. आर. नागरे वनरक्षक वेताळवाडी प. व कृष्णा पाटील यांच्या पथकाने केली. पुढील तपास एम. एम. अली वन परिमंडळ अधिकारी बनोटी हे करत आहे. दरम्यान वनविभाग ऍक्शन मोडवर आल्याने वृक्षप्रेमीमधून आनंद व्यक्त केला जात आहे.

वीटभट्टी चालकांवर कोण करणार कारवाई…

वनपरिमंडळ बनोटी हद्द असलेल्या वरठाण – पाचोरा रस्त्यावरील रस्त्याला लागून असलेल्या विटभट्ट्यांमध्ये लाकडांचा सर्रास वापर केला जात असल्याने विटभट्ट्यांवर कारवाई करणार कोण असा प्रश्न वृक्षप्रेमीमधून उपस्थित केला जात आहे. दरम्यान वनपरिमंडळ बनोटी अंतर्गत अवैधरीत्या वृक्षांची कत्तल केली जात आहे. याकडे वनविभागाचे आर्थिक दुर्लक्ष झाल्याची चर्चा बनोटी परिसरात रंगली आहे.

Related Articles

Back to top button