जि. प. चे अनेक कामे प्रलंबित, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले मुदतीत कार्यवाहीचे निर्देश.
विविध कामांचा आढावा बैठक, अधिकारी व कर्मचारीच उपस्थित असल्याने बैठक कशाची तालुल्यात चर्चा.
सोयगाव दि. ०५ (वृत्तसेवा) डिसेंबर महिना उजाडला तरीही अद्याप सोयगाव पंचायत समितीच्या अनेक विभागांच्या कामे अपूर्ण आहे. काही कामांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही पूर्ण झालेली नाही. हे बाब गंभीर आहे. त्यामुळे कार्यवाही तात्काळ पूर्ण करून विकासकामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना यांनी गुरूवारी सर्व विभाग प्रमुखांना दिले.
तालुका विविध विकास कामांचा आढावा बैठक बचत भवनात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी पाच वाजता झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी दादाराव अहिरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गितेश चावडा, गटशिक्षणाधिकारी रंगनाथ आढाव, बांधकाम अभियंता राजगुरू, मोघडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, तालुक्यातील ग्रामसेवक उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मीना म्हणाले की, तालुक्यातील मंजूर जलजीवन मिशनची कामे तातडीने पूर्ण करून ग्रामपंचायतला सुपूर्द करा, ग्रामपंचायत ची वसुली डिसेंबर अखेर पर्यंत ७० टक्के करून मार्च अखेरीस पर्यंत वसुली ९५ टक्क्यांपर्यंत झाली पाहिजे. अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या दरम्यान तालुक्यातील रोहयो अंतर्गत झालेल्या मंजूर कामांची डिसेंबर पर्यंत पूर्ण करावे तसेच नवीन रोहयो ची कामे मंजूर करावी अशा सूचना यावेळी डॉ. मीना यांनी देऊन ग्रामपंचायत निहाय ग्रामसेवक यांचेकडून योजना निहाय कामांचा आढावा घेतला यावेळी आरोग्य, शिक्षण, रोहयो, बांधकाम विभाग आदी योजना निहाय कामांचा आढावा घेवून तातडीने अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी डिसेंबर अखेर ची डेड लाईन देण्यात आली.

दरम्यान गुरुवारी आयोजित विविध कामांच्या आढावा बैठकी पासून प्रसार माध्यमांना तालुका प्रशासन कडून दूर ठेवण्यात आले होते. या वेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे पंचायत समिती कर्मचारी यांच्यामार्फत भेटण्यासाठी लेखी चिठ्ठी देऊन कळविले तर सोयगाव पंचायत समिती अधिकारी यांनी सांगितले की साहेब पंचायत समिती ऑफीस मध्ये येणार असून तिथेच तुम्हाला भेटणार आहे. असे सांगत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीना दोन तास ताटकळत बसवून देखील सोयगावच्या अधिकाऱ्यांनी भेटु दिले नाही. कारण सोयगाव पंचायत समितीमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचारावर काही प्रश्न उपस्थित करेल या भितीपोठी स्वतंत्र पंचायत समिती चे शिपाई माध्यमांवर बाहेर नजर ठेवून होते. त्यामुळे तालुका प्रशासनाचाहा सावळा गोंधळ कशा साठी होता. याचे रहस्य मात्र कळालेच नव्हते.


