महाराष्ट्र

सोयगाव तालुक्यात आचारसंहिचे उल्लंघन, आचारसंहिता पथक कागदावरच….

सोयगाव दि. २२ (वृत्तसेवा) सिल्लोड – सोयगाव मतदारसंघाचा भाग असलेल्या सोयगाव तालुक्यात आदर्श आचारसंहितेची पथक कागदावरच असल्याने आचारसंहिता पूर्वी महिलांना साडी व पिशवी वाटप करण्यात आल्या होत्या. पिशव्यांवर पक्षाची चिन्हे राजकीय नेत्यांचे फोटो, सोयगाव तालुक्यात सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांवर पक्षाचे निवडणूक चिन्ह, पक्षाचे नाव तर सोयगाव पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीच्या कोणशीलावर राजकीय नेत्यांनी नावे असून ती कोणशीला तशीच असून त्या कोनशिलेला झाकण्यात आलेले नाही. तरी देखील आदर्श आचारसंहिता पथकाकडून अंमलबजावणी केली जात नसल्याने केंद्रीय निवडणूक कार्यालय याकडे लक्ष देईल की नाही अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. दि. १५ ऑक्टोबर पासून आचारसंहिता लागली असताना देखील सोयगाव शहर व तालुक्यात अनेक ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे वाहनवरील पोस्टर्स, पक्षाचे चिन्ह, कोनशिला झाकलेल्या नाही. तर सभांचे आयोजन केल्याचे छायाचित्रे सोशल मीडियाच्या माध्यमांवर व्हायरल केली जात आहे. आचारसंहिते पूर्वी सिल्लोड – सोयगाव मतदारसंघात महिलांना साड्यांसह पिशवी वाटप करण्यात आली होती. पिशव्यांवर पक्षाचे चिन्ह व राजकीय नेत्यांचे फोटो होते. आचारसंहिते बाबत ग्रामीण भागातील महिला अनभिज्ञ असल्याने राजरोसपणे सामान ने – आण करण्यासाठी राजकीय पक्षाच्या पिशव्यांचा वापर करीत आहे. सिल्लोड – सोयगाव विधानसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या सोयगाव तालुक्यात आदर्श आचारसंहिता पथक कागदारवरच असल्याचा आरोप चंद्रास आप्पा रोकडे व संदीप इंगळे यांनी केला आहे. सोयगाव तालुक्यात आचारसंहितेची सात पथके तैनात करण्यात आल्याचे वृत्त आहे. ही पथके कागदावरच असल्याने आदर्श आचारसंहितेची तालुक्यात ऐशी की तैशी झाली आहे. सिल्लोड – सोयगाव मतदारसंघात गेल्या पाच निवडणुकांपासून एकही आचारसंहिता भंग केल्याबाबत गुन्हा दाखल झालेला नाही. आदर्श आचारसंहितेच्या पथकातील कर्मचारी, अधिकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करीत नसल्याने कार्यकर्ते बिनधास्त आचारसंहितेचे उल्लंघन करीत असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. आदर्श आचारसंहिता पथक कागदावरच राहणार की प्रत्यक्षात अंमलबजावणी करणार हे मात्र निरुत्तरीत आहे. निवडणूक विभाग अधिकारी व कर्मचाऱ्यांवर केंद्रीय निवडणूक आयोग काय कार्यवाही करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Related Articles

Back to top button