महाराष्ट्र

मनोज जरांगे पाटील यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या त्या तरूणाविरुद्ध गुन्हा दाखल..

सोयगाव दि. १० (वृत्तसेवा) शहरातील सोशल मीडिया च्या एका समूहावर मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या बद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या त्या युवकाविरुद्ध गुरुवारी रात्री अकरा वाजता सोयगाव पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात सोशल मीडियावर संतोष नाना भामरे (रा. आमखेडा सोयगाव वय ४०) यांनी गुरुवारी सायंकाळी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्या चा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे मराठा समाजाच्या संतप्त तरुणांनी रात्री नऊ वाजेपर्यंत सोयगाव पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता. व संबंधित विरुद्ध कारवाई ची मागणी केली दरम्यान मराठा तालुका समन्वय विजय काळे यांनी रात्री सोयगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून संतोष भामरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार राजू बर्डे, रविंद्र तायडे, अजय कोळी, दिलीप पवार, गजानन दांडगे आदी करत आहे.

Related Articles

Back to top button