पहिल्या बैठकीत मी प्रेमाने सांगते मात्र पुढील बैठकीत खैर नाही. अधिकाऱ्यांना आ. संजना जाधव यांनी खडसावले.
अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामासाठी पैशाची मागणी केल्यास मला तात्काळ फोन करा. आ. संजना जाधव

सोयगाव दि. १७ (वृत्तसेवा) शासकीय कामांसाठी व योजनेचा लाभासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पैशाची मागणी केल्यास मला जागेवरून फोन करावा, अधिकाऱ्यांनी ही जुने विसरून आता पुढे नवीन कामाला लागा व सोयगाव तालुक्यातील नागरिकांची कामे तात्काळ मार्गी लावावी अन्यथा पुढील बैठकीत मी अधिकाऱ्यांचा योग्य निर्णय घेईल असे बनोटी येथील आढावा बैठकीत कन्नड – सोयगाव च्या आमदार संजना जाधव यांनी अधिकाऱ्यांना सुनावले आहे. पहिल्या च बैठकीत मी प्रेमाने सांगते मात्र पुढील बैठकीत खैर करणार नाही, असेही त्यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना खडसावले आहे.
कन्नड – सोयगाव च्या आ. संजना जाधव यांनी शुक्रवारी सायंकाळी चार वाजता बनोटी येथे आढावा बैठक घेतली. यामध्ये गाव निहाय गावांच्या अडचणी नागरिकांनी मांडल्या यामध्ये बनोटी मंडळ सज्जा मध्ये तलाठी भेटत नसल्याची गंभीर तक्रार बनोटी च्या ग्रामस्थांनी उपस्थित केली. यावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन तहसीलदार मनीषा मेने यांनी दिले. बनोटीला पुन्हा दि. १७ फेब्रुवारीला फेरफार अदालत घेण्यात येणार असल्याचे तहसीलदार मनीषा मेने यांनी सांगितले. दरम्यान पुरवठा विभागाकडून शिधापत्रिका संदर्भात अडचणी उपस्थित झाल्या असता तहसीलदार मनीषा मेने यांनी दि. २८ जानेवारी ला गोमुख संस्थान येथे शिबीर घेण्याचे आश्वासित केले. ई-पीक पाहणी, अतिवृष्टीचा निधी पानंद रस्ते, घरकुल कामासाठी मोफत वाळू मिळावी, वरठाण – गोंदेगाव – पाचोरा रस्ता नित्कृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचे तक्रारी ग्रामस्थांनी उपस्थित केल्या यावर तहसीलदार मनीषा मेने गटविकास अधिकारी दादाराव अहिरे, तालुका कृषी अधिकारी रमेश गुंडीले आदींनी अडचणी सोडवण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान या बैठकीतील अडचणी पुढील बैठकीपर्यंत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ मार्गी लावाव्यात अशा सूचना आमदार संजना जाधव यांनी दिल्या यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जिजाबाई जाधव, तहसीलदार मनीषा मेने प्रकल्प अधिकारी सविता सैवर, तालुका कृषी अधिकारी रमेश गुंडीले, जिल्हा परिषद बांधकाम उप अभियंता अशोक शाखावार, गटविकास अधिकारी दादाराव अहिरे, गटशिक्षणाधिकारी रंगनाथ आढाव, नितीन बोरसे, जलसंधारण, बांधकाम, सिंचन, लघुपाटबंधारे, जिल्हा परिषद शाखा अभियंता राजेश राजगुरू, ग्रामविकास अधिकारी गणेश गवळी, दिपक मोघडे, रोहयो अभियंता सचिन चव्हाण, राहुल राठोड, आदींसह यंत्रणा ची उपस्थिती होती.

वरठाण – गोंदेगाव – पाचोरा रस्त्यासाठी भर बैठकीत ग्रामस्थ आक्रमक.
वरठाण – गोंदेगाव – पाचोरा या रस्त्याचे नुकतेच काम सुरू आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागा कडून नित्कृष्ट दर्जाचे काम सुरू होत असून या कामावर खडी बोगस वापरून संबंधित कामावर अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांनी पाहणी केलेली नसल्याचे सांगून ग्रामस्थ अभियंता सार्वजनिक बांधकाम यांचेवर आक्रमक झाले होते आमदार संजना जाधव यांनी मध्यस्थी करून ग्रामस्थांना शांत करून ते काम बंद करा मी स्वतः पाहणी केल्या वरच काम सुरू करण्याचा सूचना आमदार संजना जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या बैठकीत नितीन बोरसे, निलेश मगर, भूषण वेहेळे, तात्याराव वाडेकर, दिनेश जाधव, सुनिल जाधव, कृष्णा धुमाळ, आकाश पाटील, किशोर बावसकर, जैस्वाल, ज्ञानेश्वर चौधरी, योगेश बोरसे, ज्ञानेश्वर वेहेळे, आदींसह शेतकरी, सरपंच, उपसरपंच वग्रामस्थांची उपस्थिती होती.



