ताज्या घडामोडी

७१ वर्षानंतर श्रावणाची सुरुवात होणार सोमवारी…

सोयगाव दि. ०४ (वृत्तसेवा) देवाधिदेव महादेवाची आराधना भाविक वर्षभर करीत असतात पण महादेवाला श्रावण महिना सर्वात प्रिय मानला जातो. या महिन्यात दर सोमवारी विशेष अभिषेक पूजा केली जाते. यंदा ७१ वर्षानंतर हा दुर्मिळ योग आला आहे. श्रावणाची सुरुवात व शेवट सोमवारीत होणार आहे.

 १९५३ यावर्षी आला होता योग

यंदा श्रावणाला ०५ ऑगस्ट सोमवारी सुरुवात होत आहे. तर सांगता ०२ सप्टेंबर सोमवारी होणार आहे. ०३ सप्टेंबरला श्रावण अमावस्या आहे. श्रवणाच्या पहिल्याच दिवशी सोमवार येण्याचा हा ७१  वर्षानंतरचा अतिशय दुर्मिळ योग आहे. यापूर्वी सोमवार १० ऑगस्ट १९५३ श्रावणाला सुरुवात तर ०८ सप्टेंबर १९५३ ला शेवटचा सोमवार आला होता.

आराधनेचा काळ श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो. या महिन्यात भगवान शंकराची आणि देवी पार्वतीची खास पूजा केली जाते. महादेवांना समर्पित असणारी विविध प्रत केवल्य याच महिन्यात केली जातात याच श्रावण महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, विनायक चतुर्थी, संकष्ट चतुर्थी, शेतीला सप्तमी, दुर्गा अष्टमी व कालाष्टमी असे सण – उत्सव आहेत. तर श्रावणातील मंगळवारी मंगळागौर ही साजरी करण्यात येणार आहे.

१८ वर्षानंतर यंदा पाच श्रावणी सोमवार…

यंदाच्या श्रावणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पाच श्रावणी सोमवार असणार आहेत. यामुळे भाविकांसाठी हा पर्वणीस करणार आहे. या आधी असा योग २००६ यावर्षी आला होता. मागील वर्षी २०२३ ला अधिक मासामुळे श्रावण दोन महिने होता. या काळात आठ श्रावणी सोमवार आले होते.

श्रावण महिना कधीपासून सुरु होतोय? जाणून घ्या सोमवार कधी-कधी?

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. हा वर्षातील सर्वात पवित्र महिना मानला जातो. श्रावणात भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा मोठ्या श्रद्धेने केली जाते. या लेखात श्रावण महिना २०२४ शी संबंधित सर्व माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया.

यंदाचा श्रावण महिना खूप खास आहे, कारण हा महिना भगवान शिवाच्या दिवशी म्हणजेच सोमवारपासून सुरू होत आहे. यंदाचा श्रावण महिना ०५ ऑगस्ट २०२४ पासून सुरू होईल आणि ०३ सप्टेंबर २०२४ रोजी संपेल. यंदा ०५ श्रावणी सोमवार येत आहे.

व्रत पूजा

या पवित्र महिन्यात भक्त भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करतात. श्रावण महिन्यात अनेक भाविक सोमवारी उपवास करतात आणि शुद्ध मनाने भगवान शंकराची पूजा करतात. विवाहित स्त्रिया श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळा गौरीचे व्रत करतात. काही मुली इच्छित पती मिळविण्यासाठी आणि भगवान शंकराचा आशीर्वाद मिळविण्यासाठी सोमवारचे व्रत करतात. श्रावणात कावड यात्रा देखील खूप प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये भक्त पवित्र गंगाजवळील विविध धार्मिक स्थळांना भेट देतात आणि तेथून गंगाजल आणतात आणि शिवरात्रीच्या दिवशी ते भगवान शंकराला अर्पण करतात.

श्रावण पूजा विधी…

भक्त सकाळी लवकर उठतात आणि पूजा सुरू करण्यापूर्वी स्नान करतात. भगवान शिव आणि माता पार्वतीची मूर्तीसमोर दिवा लावून प्रार्थना करतात. महादेवाच्या पिंडीला अभिषेक करतात. शिव चालिसा, शिव तांडव स्तोत्र आणि श्रावण महिन्याची कथा पाठ करतात. शिव मंदिरात जाऊन शिवलिंगाला पंचामृत (दूध, दही, साखर, मध आणि तूप) अर्पित करतात. शिवलिंगाला जल अर्पण करून फुले व बेलपत्राने सजवतात. बेलपत्र हे भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे. भगवान शंकराला मिठाई अर्पण करतात.

श्रावण सोमवार तिथी…

पहिला श्रावण सोमवार  – ०५ ऑगस्ट २०२४

दुसरा श्रावण सोमवार   –  १२ ऑगस्ट २०२४

तिसरा श्रावणी सोमवार – १९ ऑगस्ट २०२४

चौथा श्रावणी सोमवार  –  २६ ऑगस्ट २०२४

पाचवा श्रावणी सोमवार – ०२ सप्टेंबर २०२४ (अमावास्या)

Related Articles

Back to top button