महाराष्ट्र

महिलांनी हात दाखवून सुध्दा बस थांबत नाही.

आष्टी एस.टी. आगारातील चालक - वाहक यांना फर्दापूर बस स्थानकचे वावडे.

सोयगाव दि. २९ (वृत्तसेवा) छत्रपती संभाजीनगर – जळगाव महामार्गावर जग प्रसिद्ध अजिंठा लेणी पायथ्याशी फर्दापूर येथे बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा बस आगारातील बस वाहक, चालक हे जाणीव पूर्वक बस थांबवत नाही. दि. २९ बुधवार रोजी पाथर्डी जाण्यासाठी एक महिलेणे व दिव्यांग व्यक्तीने हात दाखवले परंतु बस चालक – वाहक यांनी बस न थांबवता बस स्थानक परिसरातून सुसाट वेगाने बस पळविली. या चालक व वाहक  यांच्यावर कारवाई करण्याची मागणी प्रहार दिव्यांग  क्रांती आंदोलन तर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने व आगर प्रमुख आष्टी व सोयगाव यांच्या कडे लेखी तक्रारीने केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दि. २९ बुधवार रोजी सोयगाव येथून संदीप इंगळे व शारदाबाई मच्छिंद्र आव्हाड हे पाथर्डी जाण्यासाठी निघाले सकाळी फर्दापूर येथून  ०७:१५ वाजता जळगाव – आष्टी बस असते. त्यामुळे फर्दापूर बस स्थानक येथे येऊन थांबले बस क्र. २० बी. एल. १६८४ ही बस ०७:२५ वाजता आली. बस स्थानक येथे महिला व दिव्यांग व्यक्ती बसलेले असतांना चालकाला दिव्यांग व्यक्ती व महिलेने हात दिला तसेच आजू –बाजूला असलेले प्रवासी यांनी देखील आवाज देत हात दाखविला परंतु बस चालक – वाहक यांनी हसत – हसत बस सुसाट वेगाने पळविली. एकीकडे महाराष्ट्राचे मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना बस भाडे मध्ये सवलत देऊन महिलांचा सन्मान करीत आहे. तर दिव्यांगाना देखील बस मध्ये सवलत देऊन दिव्यांगांप्रती संवेदनशीलता दाखवली मात्र त्याच राज्यात एस. टी. बस चे चालक – वाहक मनमानी करीत महिला व दिव्यांगांची मस्करी करीत असल्याचे बुधवारी सकाळी उघड झाले.
फर्दापूर बस स्थानकावर देश – विदेशातून आलेल्या प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जग प्रसिद्ध अजिंठा लेणी येथे दररोज हजारो पर्यटक येत असतात. त्यामुळे फर्दापूर बस स्थानक येथे नेहमीच वरदळ असते. त्यात फर्दापूर बस स्थानक येथे अनेक बस चालक हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून बस न थांबविताच निघून जातात. त्यांच्यावर कोणीही कारवाई करीत नसल्याने मनमानी करीत असतात. त्यामुळे फर्दापूर बस स्थानक येथे म.रा.मा.प. महामंडळ तर्फे कर्मचाऱ्याची नेमणूक करून ये – जा करणाऱ्या बसेस ची नोंदी घेण्यात येवून ज्या बस फर्दापूर येथे थांबविल्या नाही. त्या चालक – वाहक यांच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी. अशी मागणी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन चे तालुकाध्यक्ष संदीप इंगळे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
“मि सोयगाव येथे माझ्या मुलीच्या घरून माझ्या गावी जाण्यासाठी सोयगाव हून फर्दापूर येथे सकाळी साडेसहा वाजे पासुन थांबली होती. साडेसात च्या दरम्यान बस फर्दापूर येथे आली चालकाला हात दाखविला त्याने बस थोडी-थोडी पुढे करीत पुढे जाऊन जोरात हसून बस सुसाट वेगाने पुढे पळविली त्यामुळे मि खाली खाली पडले त्यामुळे तात्काळ चालक व वाहक यांच्यावर कारवाई करण्यात यावी.”
शारदाबाई मच्छिद्र आव्हाड. चिंचपूर ई. पाथर्डी.

फर्दापूर बस स्थानक परिसरात महिलांची गैरसोय…. 

जग प्रसिद्ध अजिंठा लेणीच्या पायथ्याशी असलेल्या फर्दापूर बस स्थानक महिला, वयोवृद्ध, दिव्यांग व शालेय विद्यार्थिनीना खूप त्रास सहन करावा लागत आहे. बस स्थानक परिसरात स्वच्छतागृह, सौचालाय, मुतारी नसल्याने अडचण निर्माण होत आहे. त्यात बस स्थानक येथे इतर बसेस देखील थांबत नाही. त्यामुळे तात्काळ बस स्थानक परिसरात सौचालाय व मुतारी बांधण्यात यावी अशी मागणी महिला व विद्यार्थिनी यांच्या मधून होत आहे.
“फर्दापूर येथे अनेक बस चालक मनमानी करून प्रवाशांच्या जिवाशी खेळ करीत बस सुसाट वेगाने पळवितात. अनेक वेळा आम्ह्चे दिव्यांग बांधव दिवस-दिवस बस थांबत नसल्याने मोठ्या अडचणी निर्माण होत आहे. तरी बस चालक व वाहक यांनी किमान तीन ते पाच मिनिट बस थांबण्यात याव्या. सोयगाव आगर प्रमुख यांनी प्रत्येक बस थांबविण्यासाठी एका कर्मचाऱ्याची नेमणूक करावी. व जे वाहक – चालक बस थांबवीत नाही त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी.”
संदीप इंगळे आमखेडा ता. सोयगाव.

Related Articles

Back to top button