क्राईममहाराष्ट्र

बिबटयाचा वासरावर हल्ला, गाईने केली बिबट्याशी झुंज.

जरंडी शिवारातील घटना.

सोयगाव दि. २१ (वृत्तसेवा) आईच्या कुशीत जवळच दावणीला बांधलेल्या वासरावर गोठ्यात शिरून बिबटयाने हल्ला चढविला असता गाई ने दावण तोडून बिबटयाशी  तब्बल दहा मिनिटे झुंज करून वासराला बिबट्याच्या तावडीतून सुटका केल्याचा थरार दहा मिनिटे जरंडी शिवारात बुधवारी रात्री घडला. दरम्यान गाई ने  बिबट्या शी झुंज करुन वासराला बिबट्याच्या तावडीतून सुटका करत बिबट्याला चक्क रात्री शिवरातून हुसकावून लावले आहे. या घटनेत वासराला बिबट्याने मानेवर व गळ्यावर दात लावून गंभीर केले आहे. घटनेनंतर गायीने वासरासह रात्रीच मालकाच्या घरासमोर उभे राहून हंबरडा फोडला तेव्हा हा प्रकार लक्षात आला. जरंडी शिवारातील विजय जगताप यांच्या गट क्रमांक २०० मध्ये ही घटना घडली. याप्रकरणी वनविभागाच्या पथकांनी बुधवारी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला आहे

आठवडा भरापासून बिबट्याचा जरंडी शिवारात मुक्तपणे संचार सुरू आहे आठ दिवसात या बिबटया ने तीन शेळ्या व एक वासरा चा फडशा पाडला आहे. वनविभागाने या बिबट्याला पिंजरे लावून पकडण्यासाठी मोहीम राबवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गावालगत हा बिबट्या मुक्तसंचार करत आहे. परंतु वनविभागाने अद्यापही या बिबटयाला जेरबंद करण्यासाठी पावले उचलत नाही.

घटनास्थळी वनविभागाच्या पथकांनी पंचनामा केला आहे मात्र जखमी वासराला मदत मिळण्याची शाश्वती नसल्याचे सांगितले आहे. घटनास्थळी आलेल्या पशुसंवर्धन विभागाचे पशुधन पर्यवेक्षक गणेश काकडे यांनी गंभीर जखमी वासरा वर उपचार  करण्यात आले. जनावरे घरीच बांधण्याचा सल्ला वनविभागाने पशुपालक यांना दिला आहे.त्यामुळे वनविभागाने ही बघ्याची भूमिका घेतली असल्याचे बोलले जात आहे..

Related Articles

Back to top button