आपला जिल्हामहाराष्ट्र

दिव्यांग करणार तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच दिवाळी साजरी.

भिक मांगो आंदोलन करून दिव्यांगांतर्फे अधिकारी व लोकप्रतिनिधीना दिवाळीचा मिळणार फराळ.

सोयगाव दि. ०८ (वृत्तसेवा) दिवाळी च्या पार्श्वभूमी दिव्यांगांना थकीत संजय गांधी योजनेचे मानधन देण्यात यावे, दिव्यांगांना अंतोदय शिधाप्रतिका देण्यात याव्या व संजय गांधी योजना समितीवर दिव्यांग व्यक्तीची नेमणूक करण्यात यावी या नसता दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी तहसील कार्यालय येथे ठिय्या करीत भिक मागो आंदोलन करण्यात येईल व भिक मागून आलेले पैसे जमा करून अधिकारी यांची दिवाळी करण्यात येईल असा इशारा प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन तालुकाध्यक्ष संदीप इंगळे यांनी दि. ०७ मंगळावर रोजी लेखी निवेदनाद्वारे दिला आला आहे.

सोयगाव तालुक्यात विशेष सहाय्य योजने अंतर्गत संजय गांधी योजना व श्रावण सेवा योजनेचे अनुदान दिवाळी पूर्वी न वाटप केल्याने निराधार, वयस्कर, दिव्यांगाची दिवाळी कडू होत आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांमध्ये नाराजीचा सूर आहे. सोयगाव तालुक्यात संजय गांधी योजना व श्रावण बाळ सेवा योजने चे एकूण ८८४२ लाभार्थी असून तालुक्यात सहा महिण्यापासून मानधना पासून वंचित आहे. दिव्यांगांना अपेक्षा होती कि, दिवाळी दरम्यान थकीत मानधन मिळेल. परंतु त्यात केवळ एकाच महिन्याचे १५०० (पंधराशे) रुपये मानधन बँक खात्यात जमा केल्याने दिव्यांगांनी दिवाळी कशी साजरी करावी असा प्रश्न उपस्थित केला आहे.

सोयगाव तालुक्यातील दिव्यांगाना अंतोदय शिधाप्रतिका देण्यास वारंवार टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यासाठी पुरवठा विभागाने अनेक वेळा तोंडी व लेखी आश्वासने दिली. मात्र दिव्यांगांना फक्त चकराच मारव्या लागत आहे. सहा महिण्यापासून थकीत मानधन मिळणे अपेक्षित असतांना शासनाच्या मनमानी कारभारामुळे दिव्यांगाची दिवाळी कडू होत आहे. दिवाळी पूर्वी दिव्यांगाना संजय गांधी योजनेचे थकीत मानधन देण्यात यावे. संजय गांधी समिती स्थापन करून समितीवर एका दिव्यांग व्यक्तीची देखील नेमणूक करावी. व तात्काळ दिव्यांगांना अंतोदय शिधाप्रतिका देण्यात याव्या. वरील मागण्या दिवाळी पूर्वी देण्यात याव्या नसता तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातच ठिय्या करून भिक मांगो आंदोलन करण्यात येईल व भिकेपोटी आलेल्या पैशातून अधिकारी यांना दिवाळीची मिठाई वाटप करण्यात येईल असा इशारा दि. ०७ मंगळवार रोजी लेखी निवेदन देऊन प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन तर्फे देण्यात आला आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष संदीप इंगळे, सचिव अनिल लोखंडे, शहराध्यक्ष यासीन बेग यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

एकीकडे शासन म्हणते “शासन दिव्यांगांच्या द्वारी” परंतु सोयगाव तालुक्यातील दिव्यांग अंतोदय शिधाप्रतिका साठी पाच वर्षा पासून चकरा मारून देखील अद्याप शिधाप्रतिका मिळाल्या नाही. आम्ही अनेक आंदोलने केले परंतु पुरवठा अधिकारी व तहसीलदार यांनी फक्त आश्वासनेच दिली आहे. तसेच संजय गांधी योजनेचे सहा महिण्यापासूनचे सर्व थकीत मानधन दिवाळी पूर्वी मिळणे अपेक्षित होते. परंतु एकाच महिन्याचे मानधन देण्यात आले आहे. त्यामुळे दिव्यांगांनी दिवाळी कशी साजरी करावी असा प्रश्न आम्हा लोकांना पडला आहे. दिवाळी पूर्वी दिव्यांगांचे थकीत मानधन जमा न केल्यास भिक मागो आंदोलन करून तहसील कार्यालयाच्या मुख्यप्रवेशद्वारातच दिवाळी साजरी करू व अधिकारी, लोकप्रतिनिधीना दिवाळीचे फराळ दिव्यांगांतर्फे देण्यात येईल. संदीप इंगळे प्रहार दिव्यांग संघटना तालुकाध्यक्ष सोयगाव..

Related Articles

Back to top button