एक लाखावर थकबाकी असणाऱ्यांच्या नावाचे लागले बॅनर.

चंद्रपूर दि. २४ (वृत्तसेवा) एक लाखाच्या वर मालमत्ता कर थकीत असणाऱ्या थकबाकीदारांना करभरणा करण्यास मनपाद्वारे २१ मार्च पर्यंत मुदत देण्यात आली होती मात्र तोपर्यंत करभरणा न करणाऱ्या सर्व थकबाकीदारांची नावे सार्वजनिकरीत्या प्रसिद्ध केली गेली असुन शहरातील वर्दळीच्या सर्व चौकांवर असे बॅनर लावण्यात आले आहे.
यात विनोद बुराडे -११६२७८/-,लागूबाई भुफा – १५३१८४?- , नामदेवराव पारवेकर – १५००८६/-, केवलराम गुलाणी – ४५६०८२/-, विनस बनोत – १२२९७७/-, विदर्भ काँक्रीट प्रा. – १९८५५७/-, विठ्ठल पंदीलवार – ३२०५१५/-, मो. नजीर अ. करीम – १७७४४१/-, महंमद वसिउद्दिन – ३६२२२८/-, निर्मलादेवी पंडीत – ६२०४९१/-, शामराव लांडगे – ११८०००७/- समृद्ध जीवन फूड्स लि. – ४६९०९३/-, सायराबाई गांधी – १६६९११/-, रीना सरकार – २०३३९२/-, समृद्धी सेविंग इन्व्हेस्टमेंट – १८०६२०/- असे एकुण ५१ लक्ष २९ हजार थकबाकी असणाऱ्या १६ थकबाकीदारांची नावे प्रकाशित करण्यात आली आहे.
शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी विविध प्रकारची कर आकारणी करण्यात येते, परंतु सुविधांचा लाभ घेणारे अनेक जण कराचा भरणा करण्यासाठी चालढकल करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठीच मनपाद्वारे थकीत कर वसुलीसाठी विशेष मोहिम राबविण्यास येत आहे. कर विभागातील अधिकारी कर्मचारी नागरिकांना समजावून सांगत असल्याने अनेक जणांनी कराचा भरणा केला आहे.
१ लाखाच्या वर मालमत्ता कर थकीत असणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना मनपाच्या अधिकाऱ्यांकडून भ्रमणध्वनीद्वारे पाठपुरावा करण्यात आला होता. यासाठी त्यांना यासाठी २१ मार्च ची मुदतसुद्धा देण्यात आली होती. मात्र याउपर करभरणा न केल्यास थकबाकीदारांची नावांचे बॅनर प्रसिद्ध करण्यात आले आहे. नावे प्रसिद्ध झाल्यानंतर जर कुणाची मानहानी झाली तर त्याला ते स्वतः जबाबदार राहणार असल्याचे चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे याआधीच स्पष्ट करण्यात आले होते. या होणाऱ्या कारवाईमुळे ज्यांना या मोहिमेच्या परिणामांची कल्पना आली होती त्या थकीतदारांनी ऑनलाईन तसेच अथवा ऑफलाईन माध्यमातुन आपल्या कराचा भरणा केला आहे.


