सोयगाव शहरात शिवपुराण कथा व रुद्राक्ष महोत्सवाचे आयोजन; भैरवनाथ मंदिर संस्थानचा पुढाकार

सोयगाव दि. २९ (वृत्तसेवा) शहरातील भैरवनाथ संस्थान मंदिरात दि.०२ मार्च शनिवार ते दि. ०९ मार्च शनिवार पर्यंत संगीतमय शिवपुराण कथा व रुद्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
भैरवनाथ मंदिर संस्थानच्या प्रांगणात दि. ०२ मार्च शनिवार ते दि. ०९ मार्च शनिवार पर्यंत ह भ प अनिल महाराज तुपे नाशिक कर यांच्या अमृत वाणीतून शिवपुराण कथा होणार आहे दि. ०९ मार्च ला काल्याचे कीर्तन ह. भ. प. जयश्री ताई तिकांडे यांचे होणार आहे. महाप्रसाद दि. ०९ दुपारी आहे. या संगीतमय शिवपुराण कथेचा व रुद्राक्ष महोत्सव चा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन भैरवनाथ संस्थानच्या वतीने अध्यक्ष दिलीप बिर्ला, रवींद्र काळे, विजय अहिरे, ईश्वर घनघाव, विजय काळे, सुनील काळे, राजू दुतोंडे, यांनी केले आहे. ह. भ. प. कन्हैया महाराज लाठे कन्नड, ह. भ. प. अरुण महाराज लाडके शिवूर ता. वैजापूर, ह. भ. प. सागर महाराज बोरडे कन्नड आदींची वादक, गायक म्हणून उपस्थिती लाभणार आहे. सोयगाव व परिसरातील भाविकांनी या शिव पुराण व रुद्राक्ष महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन सोयगाव शहर व भैरवनाथ संस्थान यांनी केले आहे…



