आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अन… लेखी आश्वासनानंतर तरुणांचे आमरण उपोषण सहाव्या दिवशी स्थगित…..

सोयगाव दि. २४ (प्रतिनिधी) मुस्लिमांकडून होत असलेल्या त्रासामुळे बोरमाळ तांडा येथील तरुणांनी तहसिल कार्यालयासमोर  दि. १८ सप्टेंबर पासून आमरण उपोषण सुरू केले होते. गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर सहाव्या दिवशी दि. २३ सोमवारी दुपारी सहाय्यक गटविकास अधिकारी पी. एस. माळी यांच्याहस्ते उपोषणकर्त्यांना लिंबूपाणी देऊन आमरण उपोषण सोडण्यात आले. दरम्यान यावेळी रवी काळे, सुनिल गव्हांडे यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते.

     याबाबत सविस्तर माहिती अशी, बोरमाळ तांडा येथील किरण आजीनाथ सातपुते हा तरुण १३ ते १४ वर्षांपासून तिडका येथे भाड्याच्या दुकानात मोटारसायकल मेकॅनिकचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. स्वतःच दुकान व्हावं म्हणून ११ मार्च २०१४ रोजी पांडुरंग नामदेव गवळी रा. तिडका यांच्याकडून ग्रा. प. मालकीची जागा मालमत्ता क्रमांक ३९८ ही मध्यस्थी व्यक्ती टाकून सौदापावती करून  दि. ०७ मे २०१४ रोजी कायदेशीर नोटरी करून नावे करून घेतली नंतर तिडका ग्रामपंचायत कडून माझे लहान बंधू दीपक आजीनाथ सातपुते यांना वारसाहक्काने १५ × ३० ही जागा नावे करून दिली. ग्रा. प. तिडका अभिलेखावर माझ्या नावे अनु क्र. ४१६ मालमत्ता क्र. ३९८/१ व लहान बंधू दिपक सातपुते यांच्या नावे अनु क्र. ४१६/२ रेकॉर्ड ला आहे. माझ्या जागेत बांधकाम करण्यास सुरुवात केली असता मुस्लिम समाजाचे फहिम बशीर पटेल, मुबारक बशीर पटेल यांनी धमक्या देत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आम्हाला दोघा भावांची मालकी जागा दुकान बांधण्यासाठी ताबा द्यावा असे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर, तहसीलदार, गटविकास अधिकारी सोयगाव यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले होते. दरम्यान पाच दिवस लोटले परंतु या आमरण उपोषणाकडे एकही अधिकारी फिरकला नव्हता यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष (शरद पवार गट) रवी काळे, सुनिल गव्हांडे, भाजपा शहराध्यक्ष योगेश पाटील, वसंत बनकर, मंगेश सोहनी, युवा मोर्चा शहराध्यक्ष मयुर मनगटे, शिवसेना (उबाठा) शाखा प्रमुख गणेश कापरे, अंकुश पगारे, तिडका ग्रा.प. सदस्य दशरथ झलवार यांच्या मध्यस्थीने व गटविकास अधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषकर्ते किरण सातपुते, दिपक सातपुते, भागवत कऱ्हाळे यांनी लिंबू पाणी पिऊन आमरण उपोषण सोडले यावेळी पंचायत समिती चे आनंद पैठणे, विस्तार अधिकारी (पंचायत) ए. एन. दौड, शिपाई अमोल गायकवाड, माजी नगरसेवक योगेश मानकर, कृष्णा पाटील, सुनिल ठोंबरे, दत्तू ढगे, दिपक पाटील, महेश मानकर,  संघपाल सोनवणे आदी उपस्थित होते.

“आम्ही दि. १८ पासून तहसील कार्यालय येथे आमरण उपोषणास बसलो होतो. पाच दिवस आमच्याकडे कोणत्याही अधिकाऱ्याने फिरकून पहिले नाही. दि. २३ रोजी सोयगाव परिसरातील समाजसेवकानी प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर प्रशासनाला जाग येऊन गटविकास अधिकारी यांनी दि. २७ रोजी तिडका येथे पोलीस बंदोबस्तात चौकशी करून अंतिम निर्णय घेण्यात येईल अशा स्वरूपाचे आज (दि. २३) रोजी लेखी आश्वासन दिल्याने आम्ही आमचे उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. आम्हाला सहकार्य करणाऱ्याचे मनापासून धन्यवाद…” दिपक सातपुते, किरण सातपुते उपोषणकर्ते….

Related Articles

Back to top button