तळीरामांसह जुगार खेळणाऱ्यांचा महिलांसह शालेय विद्यार्थ्यांना त्रास.
जरंडी परिसरात अवैध धंद्यांना पाठबळ कोणाचे?
सोयगाव दि. १३ (वृत्तसेवा) सोयगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जरंडी परिसरात तळीरामांचा व जुगार खेळणाऱ्या इसमांचा परिसरातील महिला व शालेय विद्यार्थिनीना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात जरंडी ग्रामपंचायत ने सोयगाव पोलीस ठाणे येथे कळविले असून सुधा सोयगाव पोलीस ठाणे कारवाई करीत नसल्याने जरंडी परिसरातून प्रशासनावर रोष व्यक्त करण्यात येत आहे.
सोयगाव – बनोटी राज्य रस्ता क्रमांक २४ वर जरंडी परिसरासह गावात मोठ्या प्रमाणात जुगार खेळविल्या जात आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर येत आहे. तसेच शालेय विद्यार्थी देखील व्यसनाच्या आहारी जात आहे. याकडे पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे परिसरातून बोलले जात आहे. जुगार खेळविण्यासाठी खान्देश मधील पाचोरा तालुक्यातून सूत्र हालत असल्याचे बोलले जात आहे.
जरंडी, निंबायती, न्हावी तांडा, रामपूर तांडा, बहुलखेडा, कवली, माळेगाव पिंप्री परिसरात पाचोरा तालुक्यातून जुगार खेळविला जात आहे. याकडे पोलिसांचे देखील अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे सांगितले जात आहे. जरंडी गावात महात्मा फुले महाविद्यालय रस्त्यावर जि. प. प्राथमिक शाळेच्या हाकेच्या अंतरावर जुगार खेळविल्या जात असल्याने खेळणारे मुख्य रस्त्यावरच ठाण मांडून बसलेले असतात. त्यामुळे महिलांसह शालेय विद्यार्थिना त्रास सहन करून प्रवास करावा लागत आहे. या संदर्भात ग्रामपंचायत कार्यालय जरंडी यांनी ठराव घेऊन प्रशासनाला पत्र व्यवहार केला होता. परंतु त्यावर कारवाई तर नाहीच उलट अवैद्य धंदेवाईकाना पाठीशी घालत असल्याचे बोलले जात आहे. तरी यावर कोण कारवाई करणार या संदर्भात चर्चेला उधान आले आहे.
कुंपंनच शेत खात असल्याचा प्रत्यय
सोयगाव, आमखेडा, बनोटी व गोंदेगाव या ठिकाणाहून देशी व विदेशी दारू जरंडी गावासह परिसरात पुरविल्या जात असल्याने अनेकांचे संसार उघड्यावर येत आहे. तसेच शालेय विद्यार्थी देखील व्यसनाच्या आहारी जात आहे. बनोटी व गोंदेगाव तसेच सोयगाव व आमखेडा येथील देशी दारू दुकानदार हे देशी व विदेशी दारू मोटारसायकल व चार चाकी वाहनाने पोहच करीत असल्याचे परिसरातून बोलले जात आहे. तसेच मागील काही दिवसापूर्वी देखील सोयगाव पोलिसांना सोयगाव येथून देशी दारू घेऊन जात असलेल्या मोटार सायकल वर कारवाई केली होती. तरी देखील अद्याप जरंडी परिसारात देशी दारू पोहचविल्या जात असल्याचे दिसून येत आहे. यावर कारवाई होईल कि कुंपंनच शेत खाईल हे पाहणे ऑस्तुक्याचे ठरणार आहे.
छायाचित्र ओळ :- या पत्राच्या शेड मध्ये कल्याण मुंबई जुगार खेळविल्या जात आहे.


