महाराष्ट्र

अचानक लागलेल्या आगीमुळे घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक…

आमखेडा येथील घटनेत एक लाख एकतीस हजाराचे नुकसान...

सोयगाव दि. १९ (वृत्तसेवा) आमखेडा येथील शिवाजीनगर परिसरात घरात कुणी नसतांना अचानक आग लागल्याने परिसरात एकच धांदल उडाली होती. त्यावेळी प्रथम अंदाजानुसार फ्रिजच्या कॉम्प्रेसरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत घरातील एक लाख ३१ हजार रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना दि. १९ शिवाजीनगर आमखेडा परिसरात आठ ते साडे आठ वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी, शिवाजीनगर आमखेडा येथील विठ्ठल शेरे यांच्या मालकी हक्क असलेले व भाडेतत्त्वावर राहत असलेले बिराजी प्रेमचंद गायकवाड यांच्या घरातील फ्रिजच्या कॉम्प्रेसरच्या स्फोट मुळे लागलेल्या आगीत एक लाख ३१ रुपयांचे नुकसान झाल्याची घटना दि. १९ शुक्रवारी सकाळी आठ ते साडे आठ वाजेच्या सुमारास शिवाजीनगर आमखेडा परिसरात घडली. अचानक लागलेल्या आगीचे धूर बाहेर येत असताना लहान मुलांच्या लक्षात आले त्यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरीक जमा झाले. श्रीमती अर्चना उज्वल शेरे या महिलेने मोठ्या हिमतीने आग लागलेल्या घराचे कुलूप तोडून आग विझवण्यासाठी प्रयत्न करीत असताना त्यावेळी मुदतसर मुल्ला, सुमीत कोथलकर, रोशन सोनवणे, पिंटू फुसे, तुषार देहाडराय, रघुनाथ कोथलकर, किशोर ढगे, उज्वल शेरे, समाधान बावस्कर आदींनी आग विझवण्यास मदत केली. या दरम्यान घरात कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीत गायकवाड यांच्या घरातील फ्रीज, टी. व्ही. पंखे व संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याने त्यांचे एक लाख ३१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेचा पंचनामा महसूल मंडळाधिकारी मारोती धोंडकर व तलाठी व्ही. एस. पवार यांनी तर महावितरण कडून कनिष्ठ अभियंता मोहिद पठाण, लाईनमन विष्णू लाड, कैलाससिंग बारेला आदींनी पंचनामा केला असून पुढील अहवाल सोयगाव तहसिल कार्यालयात पाठविण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button